शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नका, शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:53 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरांवर मध्यरात्री कारवाई सुरू केली आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरांवर मध्यरात्री कारवाई सुरू केली आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. जुनी मंदिरेही तोडली जात आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, अशा शब्दांत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महानगरपालिकेच्या वतीने धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांनी कारवाईच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदविले. मध्यरात्री कारवाई केली जात आहे. जी मंदिरे जुनी आहेत, त्यांच्यावरही कारवाई होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नामदेव भगत यांनीही अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो; परंतु प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. नागरिकांनी पूजेसाठी सोसायटीमध्ये बांधलेली मंदिरेही तोडली जात आहेत. रिक्षाचालकांनी त्यांच्या स्टँडवर उभारलेले देव्हारेही हटविण्यात आले. रोड, मैदान व इतर महत्त्वाच्या ठिकाणी असलेली बांधकामे हटविण्यास कोणी विरोध करत नाही; परंतु नागरिकांनी श्रद्धेने उभारलेली मंदिरे तोडली जात आहेत. आता नागरिकांनी देव-धर्मही सोडून द्यायचे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मध्यरात्री जाऊन कारवाई केली जाते. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लाठीचार्ज, गोळीबार होऊन कोणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरे पाडण्याची घाई करत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण व इतर ठिकाणी प्रशासन एवढी घाई करताना दिसत नाही. मध्यरात्रीच्या कारवाईमुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. आमच्या डोळ्यांसमोर श्रद्धास्थाने पाडली जात असल्याने आम्ही हिंदुस्थानामध्येच राहात आहोत का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन बंदोबस्तासाठी आग्रह धरत आहेत. त्यांना एवढी कसली घाई झाली आहे. आमची मंदिरे पाडली, आम्हाला काही भावना आहेत की नाही? अशीच स्थिती राहिली तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. प्रशांत पाटील यांनीही घणसोलीमध्ये केलेल्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली.मध्यरात्री धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची घाई करणे चुकीचे आहे. धार्मिक स्थळेच नसतील तर पूजा-अर्चा करायची कुठे? हा प्रश्न आहे. आयुक्तांनी याविषयी तत्काळ मिटिंगचे आयोजन करावे व त्या मिटिंगला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे.- शुभांगी पाटील,सभापती, स्थायी समितीमध्यरात्री धार्मिक स्थळे पाडलेली पाहून, आम्ही नक्की भारतामध्येच आहोत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हालाही भावना आहेत. आमच्या भावनांशी खेळू नये. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई थांबविली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.- विजय चौगुले,विरोधी पक्षनेतेप्रशासनाने नागरिकांच्या भावनांशी खेळू नये. मंदिरे बांधण्यासाठी परवानगी देत नाही, जागा उपलब्ध करून देत नाही. जुनी धार्मिक स्थळेही मध्यरात्री जाऊन पाडली जात आहेत. आता नागरिकांनी देव-धर्मही सोडून द्यायचा का?- नामदेव भगत,नगरसेवक, शिवसेनामहापालिका २००९ पूर्वीच्या मंदिरांवरही कारवाई करत आहेत. मध्यरात्रीनंतर कारवाई करण्याची आवश्यकता काय? चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.- द्वारकानाथ भोईर,नगरसेवक, प्रभाग-३०घणसोलीमधील जुन्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. अधिकाºयांकडून सुरू असलेल्या कारवाईविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अधिकाºयांना एवढी घाई का झाली आहे? हेच समजत नाही.- प्रशांत पाटील,नगरसेवक-३२