शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:00 IST

आयुक्तांचे शाळा व्यवस्थापनांना आदेश; फीसाठी अडवणूक न करण्याच्या सूचना

नवी मुंबई : शाळा व्यवस्थापनांकडून विद्यार्थ्यांकडे फीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फीसाठी कोणाचीही अडवणूक केली जाऊ नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशा सूचना मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.नवी मुंबईमधील शाळा व्यवस्थापनांची बैठक आयुक्तांनी आयोजित केली होती. नवी मुंबई हे देशातील शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने आयुक्तांनी शाळा व्यवस्थापनांशी चर्चा केली. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाला आॅनलाइन शिक्षण मिळणे आवश्यक आहे. काही ठिकाणी फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत. फीसाठी तगादा लावला जात आहे. कर्ज घेऊन फी भरा, असा सल्ला दिला जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या घटना शहरात होऊ नयेत. शिक्षण हक्क कायद्याचे भान सर्वांनी राखणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेने पाठविलेल्या नोटिशीची गांभीर्याने दखल घ्यावी, वारंवार नियमांचे उल्लंघन सुरूच राहिले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेची गरज आहे. त्याच पद्धतीने शाळेलाही विद्यार्थ्यांची गरज आहे. व्यवस्थापनाने पालकांशी संवाद साधला पाहिजे. परस्परांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. व्यवस्थापनाच्या अडचणीही समजून घेण्यात आल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शिक्षण उपआयुक्त योेगेश कडुस्कर उपस्थित होते.मांडल्या समस्यालॉकडाऊनच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन, सुरक्षा, सफाई व्यवस्थेवर होणारा खर्च, वीजदेयके व पाणीदेयकांमध्ये न मिळालेली सूट या अडचणीही महानगरपालिका आयुक्तांसमोर शाळा व्यवस्थापनाकडून मांडण्यात आल्या.