शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी हिवाळ्यातच दिवाळीचा आनंद

By नामदेव मोरे | Updated: December 28, 2023 19:36 IST

नवी मुंबईत राज्यव्यापी रोजगार मेळावा : एक हजारपेक्षा जास्त पोलिसांच्या पाल्यांना मिळाला रोजगार.

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजीत राज्यातील पहिल्या रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. १०० पेक्षा जास्त कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला होता. मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील १ हजार पेक्षा जास्त पाल्यांना रोजगार उपलब्ध झाला असून यामुळे हिवाळ्यामध्येच पोलिसांच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेमधून नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते. ठाणे बेलापूर व तळोजा एमआयडीसीसह शहरातील अनेक नामांकीत कंपन्यांनी पोलिसांच्या मुलांना रोजगार देण्याची तयारी दर्शवून यामध्ये सहभाग घेतला होता. विविध कंपन्यांमधील १९८० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी नवी मुंबई, मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पोलिसांच्या मुलांनी अर्ज केला होता. राज्य राखीव दल व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांनीही अर्ज केले होते. एक हजार पेक्षा जास्त पाल्यांना एका दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार मिळालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिवाळीसारखा आनंद झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

राज्यात प्रथमच पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अशाप्रकारे रोजगार मेळावा आयोजीत केला होता. या उपक्रमाविषयी पोलिसांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सांगितले की २४ तास कर्तव्य बजावण्यात व्यस्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुलांसाठी फारसा वेळ देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची रोजगाराची चिंता कमी करण्यासाठी यावर्षीपासून रोजगार मेळावा आयोजीत केला असल्याचे सांगितले. मुख्यालय उपायुक्त संयकुमार पाटील यांनी या मेळाव्यामागील उद्देश व पोलिस कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी अतीरिक्त पोलीस आयुक्त दिपक साकोरे, उपायुक्त अमीत काळे, पंकज डहाणे, विवेक पानसरे, अमीत काळे व इतर अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. भविष्यात कौशल्य प्रशिक्षणावरही भर देण्यात येणार असून राज्यभर उत्तम दर्जाचा राेजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजीत रोजगार मेळाव्यात आयटी क्षेत्रातील रोजगार उपलब्ध झाला आहे. आज आमच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण असून हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे.- श्रद्धा काळे, पोलीस पाल्य जळगावमधील चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे. वडील पोलीस दलात असून नवी मुंबई पोलिसांच्या राेजगार मेळाव्यात अर्ज केला होता. येथे उत्तम नोकरी मिळाली असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला असून अशा प्रकारचे मेळावे सर्व ठिकाणी झाले पाहिजेत.- यश महाजन, जळगाव

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई