शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेतील ८५ कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट

By नामदेव मोरे | Updated: October 21, 2022 17:39 IST

२२ कर्मचाऱ्यांची पदोन्नती : ६३ जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

नवी मुंबई: महानगरपालिकेतील ८५ कर्मचाऱ्यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. २२ जणांची पदोन्नती करण्यात आली असून ६३ जनांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

स्वच्छता अभियानासह शहराच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान आहे. यामुळे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. १८ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक पदावरून उप लेखापाल व ४ उप स्वच्छता निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

याशिवाय १ शाखा अभियंता, १० जोडारी, ८ प्लंबर, १५ मदतनीस, ५ मीटर वाचक, ७ वायरमन, ७ माळी व १० शस्त्रक्रियागृह सहाय्यक अशा एकूण ६३ अधिकारी, कर्मचारी यांना ३ लाभांचा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. महानगरपालिकेन दिड वर्षामध्ये ३५ संवर्गात ३१५ अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती केली आहे. ५० संवर्गातील ५८३ जणांना आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे.पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंद व्यक्त केला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई