शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 00:43 IST

Diwali : बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात.

-  वैभव गायकर

पनवेल : दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे फराळ खरेदीमध्ये सुमारे ४० टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या फराळाच्या किमतीतही २० टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे.बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा अनेकांनी या तयार फराळ खरेदीकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाची भीती, त्यात बाहेरील तेलकट पदार्थ नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याने फराळ विक्री करणारे बचत गट, दुकानदार या वर्षी आर्थिक संकटात आहेत. दिवाळी म्हटले की गोडधोड फराळाचा बेत हे समीकरणच बनले असताना, कोरोनामुळे फराळ खाणारे खवय्येही गतवर्षीपेक्षा या वर्षी काही प्रमाणात जपूनच अशी भूमिका घेताना दिसून येत आहे.

तयार पदार्थांच्या भीतीनेविक्रीत झाली घट कोरोनाच्या भीतीमुळे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. या अफवा असल्या, तरी अनेक जण अद्याप कोणत्याही वस्तू अथवा पदार्थ खरेदी करताना खूप विचार करताना दिसून येत आहेत. तेलकट पदार्थ खाऊ नयेत, अशी अनेकांनी धारणा कोरोनामुळे झाल्यानेच, कोरोनाच्या भीतीमुळे तयार फराळाच्या विक्रीत यावेळी मोठी घट झालेली दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे सामानाचा तुटवडालॉकडाऊनमध्ये महागाई काही प्रमाणात वाढली आहे. विशेष मध्यंतरी अनेक दुकानांमध्ये सामानाचा तुटवडा भासत असल्याने, या फराळासाठी लागणारे साहित्य (कच्चा माल ) किंमत वाढल्याने त्याचाच परिणाम फराळाच्या किमतींवर पाहावयास मिळत आहे. म्हणून सर्व फराळांच्या किमती १०० ते दिडशे रूपयांनी वाढल्या आहेत.मागणीत सुमारे ४० टक्के घट झाली आहे. तेलकट पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र, साजुक तुपापासून बनलेल्या बेसनच्या लाडवासारख्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच चकली, अनारसे, करंजी यांनाही मागणी जास्त आहे. परदेशात नातेवाईकांना पाठविण्यासाठी तयार चिवड्याची मागणी अधिक आहे. मात्र कोरोनामुळे तयार फराळाचे दर हे यावेळी दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. 

या वर्षी कोरोनामुळे फराळच्या ऑर्डर खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळे एकमेकांच्या घरी पाहुणे म्हणून जायला अनेक जण यावेळी टाळणार असल्याने फराळाच्या मागणीत घट झाली आहे.   कोरोनामुळे अनेक जण आर्थिक संकटात असल्यानेही मागणीत घट झाल्याचा अंदाज आहे. पण त्याचा  फटका आम्हालाही बसत आहे. - मेघना रगम,बचत गट, पनवेल

टॅग्स :Diwaliदिवाळी