शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्याने संगणकावर सोडविला बारावीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:02 IST

उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत प्रथमच संगणकावर उत्तरपत्रिका सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे

पनवेल : उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत प्रथमच संगणकावर उत्तरपत्रिका सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे. पनवेल येथील के. ए. बांठिया विद्यालयात परीक्षा देणारा अनुराग रोहिदास ठोंबरे हा संगणकावर उत्तरपत्रिका सोडविणारा महाराष्ट्रातील पहिला विद्यार्थी असल्याची माहिती केंद्रप्रमुख डी. एल. शिवरामे यांनी दिली.उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरु वात झाली. पहिला इंग्रजीचा पेपर होता. या परीक्षेला महात्मा स्कूलचा विद्यार्थी अनुराग रोहिदास ठोंबरे हा कला शाखेतील विद्यार्थी दिव्यांग असल्याने, त्याने मंडळाच्या परवागनी घेऊन संगणकावर पेपर सोडविला. त्यासाठी बांठिया विद्यालयाच्या प्राचार्यांनी २ दिवसांपूर्वी नवीन लॅपटॉप खरेदी केला. त्यामध्ये त्याच्यासाठी खास गुगल आय. एम. ई. मराठी या सॉफ्टवेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच्या सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून त्याला बारकोड लावून वेगळी जमा करवायची आहे. त्यानंतर, संगणकावरील उत्तरपत्रिका डीलीट करायची आहे.सराव करून घेतलाअनुरागचे वडील रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले की, अनुरागचे हस्ताक्षर नीट येत नाही. त्याला दहावीच्या परीक्षेत रायटर घेण्यात आला होता. आम्हाला राज्य मंडळ परीक्षा समितीच्या ३० डिसेंबर २०१७च्या ठराव क्र मांक ४१ची माहिती मिळाल्याने, आम्ही त्याच्याकडून टायपिंगचा सराव करून घेतला होता. जून महिन्यात आम्ही शाळेमार्फत त्याला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी संगणक वापरण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे, बोर्डाने १५ फेब्रुवारी रोजी आम्हाला परवानगीचे पत्र दिले. केंद्राने त्याला संगणक पुरविण्याबाबत केंद्रप्रमुखांना पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.