शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘आमदार ग्राम योजना’

By admin | Updated: November 25, 2015 02:07 IST

सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आता आमदार ग्राम योजना आखण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपैकी फक्त तीनच आमदारांनी याला प्रतिसाद दिला आहे

आविष्कार देसाई, अलिबागसांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आता आमदार ग्राम योजना आखण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपैकी फक्त तीनच आमदारांनी याला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्याबाहेरच्या दोन आमदारांनीही दोन गावे दत्तक घेत जिल्ह्यातील आमदारांपुढे आदर्श घालून दिला आहे. मुदत संपली तरी अद्याप जिल्ह्यातील उर्वरित आमदारांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासाची ही नवी संकल्पना मुदतीमध्ये पूर्ण होते की नाही हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कृतीतूनच समोर येणार आहे.सरकारी पातळीवरुन ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास साधण्यासाठी विविध संकल्पना मांडण्यात येत आहेत. विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शहरी भागाच्या प्रवाहात आणणे, त्यांना भौतिक, सामाजिक आणि मानव विकासाच्या सुविधा देणे हा या मागचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागाचा विकास करता यावा यासाठी आमदार ग्राम योजना १५ आॅगस्ट २०१५ च्या सरकारी निर्णयाने कार्यान्वित करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१५ अशी मुदत वाढवून सरकारने डेडलाइन निश्चित केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा सदस्य असून, तीन विधान परिषदेचे सदस्य असे एकूण १० आमदार निवडून आलेले आहेत. यापैकी अलिबागचे आमदार सुभाष पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील धोकवडे ग्रामपंचायतीचा समावेश आमदार ग्राम योजनेत केला आहे. त्याचप्रमाणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील तुर्भे गावचा विकास करण्याचे ठरविले आहे, तर पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सुधागड तालुक्यातील महागावला दत्तक घेतले आहे.नवी मुंबईमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी खालापूर तालुक्यातील मोरबे आदिवासी वाडीपाड्यांचा विकास करायचे ठरविले आहे. विक्रोळीचे आमदार सुनील राऊळ यांनी विकासासाठी अलिबाग तालुक्यातील परहूरवर लक्ष केंद्रित केले आहे. परजिल्ह्यातील आमदारांनी गावे दत्तक घेतली असताना येथील आमदारांना विकासासाठी कोणत्या गावाची निवड करायची हेच सुचलेले नसल्याचे दिसून येते. आमदारांच्या वाट्याला प्रतिवर्षी येणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या विकास निधीतून दत्तक घेतलेल्या गावाचा विकास साधायचा आहे. त्याचप्रमाणे परिसरातील विविध कंपन्यांच्या सीएसआरमधूनही गावच्या विकासासाठी निधी घेऊ शकणार आहेत.