शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या सभेला येणाऱ्या महिलांसाठी जिल्हानिहाय कलर कोड!

By कमलाकर कांबळे | Updated: January 10, 2024 21:11 IST

महिला सशक्तिकरण अभियानाची होणार सुरुवात : कोकण आयुक्तांनी घेतला आढावा

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय समितीची बुधवारी बैठक झाली. यात कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांचा गोंधळ होऊ नये, यासाठी त्यांच्या जिल्हानिहाय ओळखपत्र तसेच कलर कोड देण्याबाबत सूचना कोकण विभागीय आयुक्तांनी दिल्या.

कोकण भवनच्या पाचव्या मजल्यावरील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला सशक्तीकरण अभियान सोहळ्याच्या नियोजनासाठी कोकण विभागातील २६ प्रमुख अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून सुमारे एक लाखाहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सेवासुविधा, तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहनांसाठी पार्किंग, प्रवेशद्वार, विविध ठिकाणांहून नवी मुंबईला जोडणारे रस्ते, आदी स्वरूपाच्या सेवासुविधांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयु्क्त रुबल अग्रवाल, परिवहन आयुक्त विवेक भिमणवार, जिल्हाधिकारी (मुंबई शहर) राजेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, कल्याणच्या महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख तसेच कोकण विभागातील पोलिस यंत्रणेतील अधिकारी तथा समिती सदस्य उपस्थित होते.

महिलांच्या मदतीसाठी समन्वयककार्यक्रमाला येणाऱ्या महिलांचा गोंधळ होऊ नये, यासाठी वाहनतळापासून ते मंडपापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवक व समन्वयक यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. उमेद, अंगणवाडी सेविका, बचतगट यांनी येताना वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना सोबत आणू नये, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. कार्यक्रमस्थळी मंडपात येताना पर्स, मोबाइल आणि ओळखपत्र यांशिवाय कोणत्याही इतर गोष्टी जवळ बाळगता येणार नाहीत, अशा सूचनाही सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई