शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदा २ हजार ७६८ सार्वजनिक होळ्या

By admin | Updated: March 22, 2016 02:26 IST

होलिकोत्सवाकरिता जिल्हा सज्ज झाला असून, यंदा रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात एकूण ३ हजार ९०४ ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

जयंत धुळप,  अलिबागहोलिकोत्सवाकरिता जिल्हा सज्ज झाला असून, यंदा रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात एकूण ३ हजार ९०४ ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये २ हजार ७६८ सार्वजनिक तर १ हजार १३६ खाजगी होलिकोत्सवांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३१७ सार्वजनिक होलिकोत्सव माणगांवमध्ये तर सर्वाधिक १३० खाजगी होलिकोत्सव खोपोलीमध्ये असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. बालगोपाळांच्या पारंपरिक छोट्या होळ््यात जिल्ह्यात गावागावांत प्रारंभ झाला आहे तर कोळी बांधवांच्या पारंपरिक होळीचा सण मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. त्याकरिता किनारपट्टीतील गावांतील कोळीवाडे गजबजू लागले आहेत.जिल्ह्यातील होळी, धूलिवंदन, शिवजयंती व रंगपंचमी या लागोपाठ लागून आलेल्या सणांच्या वेळी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हा आदेश २२ मार्च मध्यरात्री १२ ते २१ एप्रिल २०१६ ला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अमलात राहाणार आहे. या आदेशान्वये रायगड जिल्ह्यात पोलीस कार्यक्षेत्रात असलेल्या पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत तोंडी व लेखी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग ठरवणे, उपासनेच्या जागेवरती किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन अडथळा निर्माण होऊ नये, देवालये व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे याचे नियमन व नियंत्रण ठेवणे, याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये शिक्षा पात्र गुन्हा होईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी केले आहे.