शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत दोन लाख रामप्रसाद लाडूंचे वाटप

By योगेश पिंगळे | Updated: January 21, 2024 19:09 IST

रामपताका, दीपोत्सव दिवे अभियान.

नवी मुंबई : स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान तर्फे अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी रामभक्तांना प्रभू रामाच्या जयघोषामध्ये ५० हजार किलो म्हणजेच सुमारे दोन लाख लाडूंचे राम प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. तसेच रामपताका आणि  दीपोत्सवासाठी दिव्यांचे वाटप करण्यात आले.

कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाचा मैदान परिसर श्रीराम गीतांनी भक्तिमय बनला होता.  सर्वत्र रामपताका डौलाने फडकत होत्या. आयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्साह आणि आनंद प्रत्येक रामभक्ताच्या चेहऱ्यावर जाणवत होता. माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह  रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव नाईक आणि संदीप नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रसादाचे लाडू वळण्याचे सेवाकार्य यावेळी केले. नवी मुंबईतील विविध मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळांमध्ये रामप्रसाद, राम पताका आणि दीपोत्सवासाठी दिवे वितरित करण्यासाठी संबंधित विभागातील रामभक्तांकडे आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडे  सुपूर्द करण्यात आले. केवळ भारतातच नाही तर जगभरात श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा होत आहे. रामभक्तांनी घरोघरी, सर्वत्र रामपताका लावून आणि दिवे प्रज्वलित करून प्रतिष्ठापना उत्सव  साजरा करण्याचे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी  केले.

प्रभू रामचंद्रांची महारांगोळी...श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान तर्फे कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या पटांगणावर श्री रामाची ३६०० चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे. प्रख्यात कलाकार श्रीहरी पवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बारा तासांच्या परिश्रमानंतर ही श्रीरामाची मनमोहक रांगोळी साकारली आहे. या रांगोळीसाठी तब्बल ७५० किलो विविध रंगांच्या रांगोळीचा वापर करण्यात आलेला आहे. सोमवारी ही महारांगोळी सर्वाना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई