शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 23:47 IST

एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

नवी मुंबई : एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करत आहेत. स्वत:च्या हिमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित केला जाणारा ‘लोकमत सखी सन्मान’ उद्या, शनिवारी नवी मुंबईत नेरुळ येथे पार पडणार आहे़ तेरणा डेंटल कॉलेजच्या आॅडिटोरियममध्ये संध्याकाळी ५ वाजल्यापासून हा सोहळा रंगेल़महिला सक्षमीकरणात सदैव अग्रेसर असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे मुंबई शहरातील ध्येयवेड्या व सेवाव्रती महिलांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी व त्यांचा ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, कला आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील स्त्रियांना सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय ‘लोकमत’ सखी मंचतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रायोजक तेरणा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पार्टनर विजय नाहटा फाउंडेशन आणि पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे उपस्थित राहणार आहेत, तसेच सिनेअभिनेत्री मुक्ता बर्वे, नामवंत फॅशन डिझायनर व दिग्दर्शक विक्रम फडणीस हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेंटमेंट प्रस्तुत सनशाईन फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावर प्रोडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांबरोबर संवाद साधला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत़आयुष्यातील अंधार सकारात्मक विचारांनी कशा प्रकारे दूर करू शकतो, आपल्या विचारांवर कसे नियंत्रण ठेवू शकतो, यावर भाष्य करणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.पुरस्कार सोहळा ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या सर्वच वाचकांसाठी आणि ‘सखी मंच’च्या सर्व सभासदांसाठी खुला असून, वाचकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने केले आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात आशिमिक कामठे प्रस्तुत ‘वारसा माझ्या कलेचा’ या स्त्रीशक्तीवर आधारित कार्यक्रमाद्वारे होणार आहे.>कार्यक्रमाचे आकर्षणकनिरा आर्ट्सचे कलाकार सप्तसुरांची मैफील हा सांगीतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.तेरणा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, विजय नाहटा फाउंडेशन हे पार्टनर आहेत. तर सहप्रोयाजक पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. आहेत.