शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

शिवसेनेतील बंडखाेरांविरोधात बेलापूरमध्ये असंतोष, वाशी मध्यवर्ती कार्यालयातून शिंदेंचा फोटो काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 13:11 IST

शनिवारी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यासह बडखोरांचा निषेध केला. वाशीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली.

नवी मुंबई : शिवसेनेतील बंडखोरांविरोधात बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे. मात्र शिंदे समर्थक पदाधिकाऱ्यांनीही मौन बाळगणे पसंत केले आहे.शनिवारी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यासह बडखोरांचा निषेध केला. वाशीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. त्यानंतर मध्यवर्ती कार्यालयातील शिंदे यांचा फोटोही हटविला. नेरूळमध्येही पालकमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तर बेलापूरमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी ऐरोली विधानसभा मतदारसंघातील  पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. अद्याप कोणीही बंडखोरांचा निषेध केलेला नाही. जोपर्यंत शिंदे यांची हकालपट्टी होत नाही किंवा ते स्वत: अधिकृतपणे शिवसेना सोडत नाहीत, तोपर्यंत कोणाचाही निषेध किंवा समर्थन न करण्याची भूमिका घेतली आहे. 

नवी मुंबईमधील शिवसेनेतही जुने निष्ठावंत व मागील सात वर्षांमध्ये पालकमंत्र्यांनी भाजप, राष्ट्रवादीतून फोडून आणलेल्यांचा गट आहे. पक्षातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांचा गट शांतच आहे. जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांची आंदोलनात गर्दी पाहावयास मिळाली. फायद्यासाठी पक्षात आलेले कसोटीच्या काळात बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीकाही पदाधिकारी करू लागले आहेत.

राज्यातील बंडखोरी म्हणजे भाजपने शिवसेनेसाठी लावलेला सापळा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषारी मैत्रीमुळे हे घडले आहे. पण या अडचणीच्या काळातही नवी मुंबईतील शिवसैनिक पक्ष प्रमुखांसोबतच राहणार आहेत. - विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख, बेलापूर

आम्ही शिवसेनेबराेबरच आहोत. पक्षाच्या बैठकांमध्येही सहभाग घेत आहोत. बंडखोरीच्या सर्व हालचालींकडे लक्ष असून,  पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम सुरू राहील. - द्वारकानाथ भोईर, जिल्हा प्रमुख, ऐरोली 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना