शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सायबर सिटीतील उद्यानांची दुरवस्था, लहान मुलांसह आबालवृद्धांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:11 IST

स्वच्छ आणि हरित नवी मुंबईच्या संकल्पनेवर कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या महापालिकेला शहरातील उद्यानांचा विसर पडला आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : स्वच्छ आणि हरित नवी मुंबईच्या संकल्पनेवर कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या महापालिकेला शहरातील उद्यानांचा विसर पडला आहे. अनेक उद्यानांची दयनीय अवस्था झाली. तुटलेली खेळणी, उखडलेली आसन व्यवस्था, गंजलेले प्रवेशद्वार, उद्यानात वाढलेले रानटी गवत हे दृश्य बहुतांशी उद्यानात पाहायला मिळते. या प्रकाराकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने लहान मुलांसह आबालवृद्धांची मोठी गैरसोय होत आहे.महापालिकेने नवी मुंबईत २४५ उद्याने विकसित केली आहेत, यातील काही उद्यानांत अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, तर काही उद्यानांत लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसविण्यात आली आहेत. मध्यंतरीच्या काळात स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत उद्यानांच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला; परंतु सर्वेक्षण संपताच ही उद्याने दुर्लक्षित झाली आहेत. वाशी सेक्टर १० (अ) येथील स्व. मीनाताई ठाकरे उद्यानात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून प्राण्यांची शिल्प उभारली आहेत. लहान मुलांना विविध प्राण्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने ही शिल्पे साकारण्यात आली आहेत. तसेच लहान मुलांसाठी टॉय ट्रेनही सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात या शिल्पांची औपचारिक देखभाल करण्यात आली; परंतु त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाला या शिल्पांचा विसर पडला. याचा परिणाम म्हणून आजमितीस यातील बहुतांशी शिल्पाला तडे गेले आहेत, तर काही शिल्पावर शेवाळ चढल्याने रंग उडाला आहे. याच उद्यानात लहान मुलांच्या करमणुकीसाठी टॉय ट्रेन (झुक झुक आगगाडी ) सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात ही ट्रेन बंद असते, त्यामुळे उद्यानातील कंत्राटी कामगारांनी या ट्रेनचा वापर दुपारच्या जेवणावळी आणि विश्रांतीसाठी सुरू केल्याचे पाहावयास मिळते.नेरुळ, बेलापूर आणि कोपरखैरणे परिसरातील काही अपवाद वगळता अनेक उद्यानांची अवस्था बिकट झाल्याचे दिसून आले आहे. ऐरोलीत सेक्टर १८ येथील स्व. रामदास बापू पाटील या उद्यानाचीही बिकट अवस्था झाली आहे. उद्यानातील खेळणी तुटली आहेत. लाकडी आसने मोडकळीस आली आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या उद्यानाचे लोखंडी प्रवेशद्वार गंजलेल्या अवस्थेत असून, ते पूर्णत: मोडकळीस आले आहे, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या उद्यानाच्या संरक्षण भिंतीचा दक्षिणेकडील भाग कोसळला आहे. प्रवेशद्वार आहे; पण तेही पूर्णत: गंजले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवेशद्वाराला कुलूपही लावता येत नाही. उद्यानातील दिवाबत्ती गायब झाली आहे, याचा फायदा मद्यपी आणि गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. या उद्यानात समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.>महापालिका कार्यक्षेत्रातील उद्यानांची पाहणी करण्यात आली आहे. कोणत्या उद्यानात दुरुस्ती व डागडुजीची आवश्यकता आहे, याचा तपशील गोळा करून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. स्थापत्य विभागाकडून तशा आशयाचे पत्रही प्रशासनाला देण्यात आले आहे. वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेनजवळील प्रकाराबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील. पावसाळ्यानंतर ही टॉय ट्रेन लहान मुलांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल.- नितीन काळे,उपायुक्त, उद्यान विभाग,महापालिका