तलासरी : तलासरी आरोग्य विभागांतर्गत असलेल्या उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या 7क्वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाइकांनी आरोग्य केंद्राची तोडफोड करीत आरोग्य कर्मचा:याबरोबर तेथे परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेल्या सहायक गटविकास अधिका:यांनाही मारहाण करून त्यांची गाडी फोडली.
उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सकाळी मशापाडा येथील मंगल पांडय़ा कुरकुडे (7क्) यांना गंभीरावस्थेत उपचारासाठी त्यांच्या नातेवाइकांनी दाखल केले. परंतु त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मंगल कुरकुडे यांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली व दोन तासांत गावातील दीडशे-दोनशेचा संतप्त जमाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाला व त्यांनी आरोग्य केंद्रावर दगडविटांचा भडिमार केला. दरम्यान, आरोग्य कर्मचारी पळून जाऊ नयेत म्हणून दवाखान्याला बाहेरून कुलूप लावून कर्मचा:यांना आतमध्ये कोंडून हल्ला करण्यात आला. यात संपूर्ण प्राथमिक आरोग्याचे जमावाकडून नुकसान करण्यात आले.
बालदिनानिमित्त पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी तलासरीत होते. त्यांना घटना समजताच त्यांनी तत्काळ सहायक गटविकास अधिकारी वसंत वरठा यांना घटनास्थळी पाठवले; परंतु जमावाने त्यांनाही मारहाण करून त्यांच्या सरकारी वाहनाची तोडफोड केली. या वेळी तलासरी पोलीस घटनास्थळी पोहोचले तरीही जमावाकडून आरोग्य केंद्राची तोडफोड सुरूच होती. यात डॉक्टर सचिन माने, परिचारिका व इतर कर्मचा:यांनाही जबर मारहाण केली. तर जमावाकडून परिचारिकेचा विनयभंग करण्याचा प्रय}ही झाला.
पोलिसांनी या वेळी बळाचा वापर करून संतप्त जमावाला पांगविले. दरम्यान रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
घटनास्थळी गटविकास अधिका:यांना पाठवून चौकशी
करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन
माने, कार्यरत एएनएम व कम्पाउंडर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. (वार्ताहर)
जमावाला शांत करायचा प्रयत्न करूनही जमावाने सरकारी वाहनाचे व आरोग्य केंद्राचे प्रचंड नुकसान केले. आदिवासी ग्रामीण भागात अधिकारी कर्मचा:यांनी काम कसे करायचे हा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया सहायक गटविकास अधिकारी वसंत वरठा यांनी दिली.