शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाच नगरसेवक ठरणार अपात्र

By admin | Updated: January 7, 2016 00:32 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दाखला देण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे करीत स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या पाच नगरसेवकांचे नगरसेवकपद

शशी करपे,  वसईजात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दाखला देण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे करीत स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या पाच नगरसेवकांचे नगरसेवकपद कायद्यानुसार रद्द होत असून त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक देखील लढता येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. वसई विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक समीर डबरे, अतुल साळुंखे, शबनम शेख, हेमांगी पाटील आणि शिवसेनेचे स्वप्नील बांदेकर यांनी निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला न दिल्याने त्यांचे नगरसेवकपद होणे जवळपास निश्चित झाले आहे. पालिकेची १४ जूनला निवडणूक होऊन १६ जूनला निकाल लागला. राखीव जागांवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या नगरसेवकांनी निकाल लागल्यानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला सादर करणे बंधनकारक आहे. त्याचा कालावधी १६ डिसेंबरला संपल्यानंतर ज्या नगरसेवकांनी दाखला दिला नाही त्यांच्याबद्दलचा सविस्तर अहवाल महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवून योग्य कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिकेला अद्याप कोणताच अभिप्राय आलेला नाही. तो आल्यानंतरच नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.पाचही नगरसेवकांनी दाखला मिळण्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विलंब लागल्याचे कारण देत स्वत:चा बचाव सुरु केला आहे. स्वप्नील बांदेकर आणि अतुल साळुंखे यांनी मुदत संपल्यानंतर दोन दिवसांनी दाखला सादर केला आहे. तर शबनम शेख यांनी १ जानेवारीला दाखला सादर केला. समीर डबरे यांच्या दाखल्याला हेमा अल्फान्सो यांनी हरकत घेतल्याने त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या संपूर्ण प्रकरणी लोकमतने राज्य निवडणूक आयोग आणि कोकण भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून माहिती घेतली असता तेथील अधिकाऱ्यांना नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीवरून पाचही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज सादर करताना राखीव जागांवर निवडणूक लढवत असलेल्या प्रत्येक उमेदवारांकडून हमीपत्र घेतले जाते. त्यात, जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत सादर करण्याबाबतची हमी मी या हमीपत्राद्वारे देत आहे, निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि मी महानगरपालिका सदस्य राहण्यास अपात्र ठरेन, असे शपथपत्रावर लिहून घेतले जाते. त्यामुळे हमीपत्रानुसार दाखला वेळेत मिळवून तो सादर करण्याची जबाबदारी संबंधित सदस्याची असते. म्हणूनच विलंब झाल्यास सदस्याला जबाबदार धरून त्याचे नगरसेवकपद आपोआप रद्द होते, असेही समितीच्या अधिकाऱ्याने सांगितले.समितीला कागदपत्रे सादर केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल तर दाखला ताबडतोब दिला जातो. कागदपत्रांची कमतरता असेल तर समिती संबंधितांना वारंवार लेखी कळवत असते. मुदतीचे बंधन समितीवर नसते. म्हणूनच मुदतीत दाखला हवा असेल तर संबंधितांनी योग्य कागदपत्रे सादर करून पाठपुरावा करणे गरजेचे असते, असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.