शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

काल रत्नागिरीत नाराजी, आज वाशीत कौतुक; विष्णुदास भावेतील सुविधांविषयी समाधान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 10:34 IST

रत्नागिरीतील प्रयोगाप्रसंगी अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळणार नसतील तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत रसिकप्रेक्षकांची माफीही मागितली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एकीकडे रत्नागिरीतील नाट्यगृहात एसीपासून साऊंड सिस्टीमपर्यंत कुठलीच सुविधा योग्यरित्या मिळत नसल्यामुळे अभिनेते भरत जाधव यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयी-सुविधांबद्दल अनेक कलाकारांनी सोमवारी समाधान व्यक्त केले. 

इतकेच नाही तर विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयीसुविधा सर्वोत्तम असून, रत्नागिरीसह राज्यभरातील इतर नाट्यगृह चालकांनी तसेच नगरपालिका व पालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेचा आदर्श ठेवावा, असे आवाहनही केले आहे. दरम्यान, नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत अभिनेते प्रशांत दामले यांनीही नुकतीच कल्याणमध्ये नाराजी व्यक्त केली होती. 

रत्नागिरीतील प्रयोगाप्रसंगी अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांमध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळणार नसतील तर यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत रसिकप्रेक्षकांची माफीही मागितली होती. त्यानंतर  राज्यातील नाट्यगृहांमधील गैरसोयींचा प्रश्न ऐरणीवर आला. नाट्यगृहांच्या दुरवस्थेविषयी कलाकारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असताना, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे  नाट्यगृहाचे मात्र कलाकारांकडून कौतुक होत आहे. 

मेकअपरूममधून स्टेजवरचे दिसते  अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने विष्णुदास भावे नाट्यगृहाविषयीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला आहे.  अनेक शहरांमधील नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे. अशा स्थितीत विष्णुदास भावे नाट्यगृहाचे वेगळेपण व्हिडीओमधून सांगितले आहे. वातानुकूलित यंत्रणा अद्ययावत आहे. मेकअप रूममध्ये स्क्रिन बसविला आहे. यामुळे स्टेजवर काय चालले आहे, हे कलाकारांना आतमध्ये बसून पाहता येते असे कलाकारांनी सांगितले आहे.

यांनी व्यक्त केले समाधानअभिनेत्री मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम यांच्यासह अनेक कलाकारांनी नाट्यगृहामधील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेने ज्याप्रमाणे नाट्यगृहाचे व्यवस्थापन सांभाळले आहे, येथे अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत, त्याचे अनुकरण राज्यभर होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. वातानुकूलित यंत्रणा व इतर सुविधाही दर्जेदार आहेत. राज्यातील इतर नाट्यगृह व्यवस्थापनांनी याचे अनुकरण केले पाहिजे. - मुक्ता बर्वे, अभिनेत्री

राज्यातील इतर नाट्यगृह व नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाट्यगृह यामध्ये खूप फरक आहे. नवी मुंबई महापालिकेने सर्वोत्तम सुविधा पुरविल्या असल्यामुळे येथे प्रयोग करताना वेगळा आनंद मिळत असतो.- रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

टॅग्स :Bharat Jadhavभरत जाधव