शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिडको विरोधात पनवेलकरांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:05 IST

शासनाचा आदेश धाब्यावर बसवून सिडकोने तीन दिवसांपासून पनवेलकरांची कचराकोंडी केली आहे

वैभव गायकर पनवेल : शासनाचा आदेश धाब्यावर बसवून सिडकोने तीन दिवसांपासून पनवेलकरांची कचराकोंडी केली आहे. मनपा क्षेत्रामध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोच्या या मनमानी कारभाराविरोधात शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांची अडवणूक थांबविली नाही तर सिडकोविरोधात जनआंदोलन उभारण्याची तयारी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनी सुरू केली आहे.शहराचे शिल्पकार म्हणविणाºया सिडकोने नागरिकांच्या सुविधांपेक्षा भूखंड विकून पैसे मिळविण्यास प्रथम प्राधान्य दिले आहे. नवी मुंबईतही सिडकोच्या ताब्यात असलेल्या भागात कधीच योग्य सुविधा दिलेल्या नाहीत. घाईगडबडीमध्ये नोड महापालिकेकडे हस्तांतर करून जबाबदारीतून सुटका करून घेतली. त्याच पद्धतीने पनवेल महापालिकेवर दबाव वाढवून कचºयासह सामाजिक सुविधांच्या जबाबदारीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून कचरा उचलण्याची व साफसफाईची सेवा महापालिकेने हस्तांतर करून घ्यावी यासाठी गडबड केली जात आहे. शासनाने कचरा उचलण्याची जबाबदारी सिडकोचीच असून मार्ग काढण्यासाठी समिती स्थापन केली आहे. परंतु सिडकोने विश्वासात घेतले नसल्याचे कारण सांगून चक्क शासनाचा आदेश धाब्यावर बसविला व बुधवारपासून खारघर ते पनवेलपर्यंतचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला. शहराची कचरा कुंडी व शहरवासीयांची कचरा कोंडी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ८० टक्के रोड कचºयाच्या ढिगाºयाने व्यापला आहे. प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. नागरिकांना रोडवरून चालणे मुश्कील झाले आहे. कचºयामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी कुत्रा चावल्याची घटना घडली आहे. खारघर व कळंबोलीमध्ये भटकी कुत्री मागे लागल्यामुळे दोन मोटारसायकलचा अपघात झाल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणी फारसे जखमी झाले नाही.सिडकोने सुरू केलेल्या मनमानीचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. राज्य शासनाने दिलेले आदेश एक महामंडळ मान्य करत नाही ही गोष्ट सर्वांना खटकू लागली आहे. राज्य शासन मोठे की सिडको मोठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिडकोच्या मनमानीचा नागरिक, सामाजिक संस्थांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी निषेध करण्यास सुरवात केली आहे. स्वत:च्या अहंकारासाठी जनतेला वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे आहे. पनवेलकरांची कोंडी केली जाणार असेल तर जनता सिडको विरोधात आंदोलन सुरू करेल. वेळ पडल्यास कचरा सिडको मुख्यालयामध्ये टाकून या घटनेचा निषेध व्यक्त केला जाईल. कचºयाची होळी करून सिडकोच्या विरोधात घोषणाबाजी केली जाईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. कचºयामुळे साथीचे आजार पसरले किंवा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.