शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नळजोडण्या खंडित केल्याने असंतोष

By admin | Updated: May 15, 2016 04:06 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तुर्भे नाका हनुमान नगरमधील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. नागरिकांचे पाणी बंद करून ते गटारात सोडून दिले आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तुर्भे नाका हनुमान नगरमधील अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. नागरिकांचे पाणी बंद करून ते गटारात सोडून दिले आहे. मागणी करूनही अधिकृत नळजोडणी न दिल्यामुळे व अचानक पाणी थांबविल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाने एक आठवड्यापासून अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई सुरू केली आहे. जवळपास ५०० नळजोडण्या खंडित केल्या आहेत. शुक्रवारी तुर्भे नाका येथील हनुमान नगरमध्ये कारवाई करण्यात आले. नागरिकांचा पाणीपुरवठाच खंडित करण्यात आला. नागरिकांनी विनंती केल्यानंतरही प्रशासनाने काहीही ऐकले नाही. आयुक्तांचे आदेश आहेत, यामुळे आता अधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांनाच पाणी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात ३०० पेक्षा जास्त नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाने कारवाई करून नागरिकांच्या घरामध्ये जाणारे पाणी गटारामध्ये सोडून दिले आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. आम्हाला पिण्यासाठी पाणी देत नाही व दुसरीकडे गटारात पाणी जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. हनुमान नगरमधील अनेक नागरिकांनी २०१३ मध्येच महापालिकेकडे अधिकृत नळजोडणी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. आवश्यक कागदपत्रे व पालिकेचे शुल्कही भरले आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पाणीपुरवठा विभागात फेऱ्या मारूनही अधिकृतपणे नळ दिलेला नाही. पालिकेचे कर्मचारी वारंवार हेलपाटे मारावे लावत होते. तुम्हाला पाणी मिळत आहे, मग विनाकारण विलंब का करता, अशी उत्तरे दिली जात होती. पैसे भरून पाणी दिले नाही व आता अधिकृत नळ घेतला नसल्याचे कारण सांगून मे महिन्यात पाणीपुरवठा थांबविल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गरिबांना पाण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये. ज्यांनी वेळेत नळजोडण्या दिल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.