शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

अपंग ट्रॅव्हल्सवाला बनला भाजी विक्रेता, उदरनिर्वाहासाठी शोधला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:27 IST

अपंगत्वावर मात करत शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून पनवेल शहरात तो त्याची विक्री करत आहे. यामुळे तुटपुंज्या नफ्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोनाच्या संसर्गामुळे पनवेल महापलिका क्षेत्रातील ट्रॅव्हल्स व्यवसाय करणारी दुकाने बंद आहेत. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत ट्रॅव्हल्स दुकानदार सापडले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवर कामाला असणाऱ्या हितेश पंड्या याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला आहे. अपंगत्वावर मात करत शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून पनवेल शहरात तो त्याची विक्री करत आहे. यामुळे तुटपुंज्या नफ्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दूध, भाजीपाला, दवाखाने, किराणा दुकाने वगळली असता इतर दुकाने पूर्णत: बंद करण्यात आली होती. यात ट्रॅव्हल्स व्यवसायही बंद झाले आहेत. ही बुकिंग दुकाने बंद झाल्याने येथे काम करणाºया अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हितेश पंड्या याला लहानपणी पोलिओमुळे अपंगत्व आले. त्यामुळे मागील १८ वर्षांपासून येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीत बुकिंगचे काम करीत आहे. मात्र दुकान तीन महिने बंद असल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. घरी थकलेले आई-वडील आहेत. त्यांच्या उपचाराकरिताही अडचणी येऊ लागल्या. घरभाडे भरणे अशक्य झाले आहे. अपंग असल्याने दुसरे काम जमण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला.>मित्रांची मदत: मित्राच्या साहाय्याने पैसे जमवून शेतकºयाकडूनच भाजी खंरेदी करून स्वस्त दरात पनवेलमध्ये हितेश सध्या भाजी विक्री करीत आहे. मिळणाºया तुटपुंज्या नफ्यातून घर चालवणे शक्य झाले असल्याचे हितेश यांनी सांगितले.>अपंगत्वावर मातलहानपणी अपंगत्व आले. परंतु निराश न होता दहावीपर्यंत इंग्लिश माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून फर्निचर दुकानात नोकरी केली. त्यानंतर १८ वर्षे ट्रॅव्हल्स कंपनीत बुकिंग एजंट म्हणून काम केले. कोरोनामुळे रोजगारच थांबला. जगणे असह्य झाले. घरभाडे थकले. पायाने अपंग असल्याने जड काम करू शकत नाही. अशात स्वत:ला सावरत भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू करून आपल्या अपंगत्वावर पुन्हा एकदा मात केली.