शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दिघी बंदर रेल्वेला जोडणार !

By admin | Updated: September 14, 2016 04:43 IST

कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे

नितीन देशमुख,  पनवेलकोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला रोह्याशी जोडणाऱ्या मार्गबाबत सामंजस्य करार करण्याचा प्रस्ताव असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रेल्वे स्थानकाच्या भुमिपूजनासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नुकतेच येथे आले होते. रेल्वे मार्गामुळे कोकण उर्वरित महाराष्ट्राला जोडले जाऊन विकासाच्या वाटा उघडणार आहेत. पुढील काही वर्षात रेल्वे क्षेत्रात जवळपास १५० अब्ज रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून एल.आय.सी. आणि रेल्वे पायाभूत घटक हे याचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहेत. देशभरातील रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी तब्बल ८०५० कोटी रु पये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.देशाला लाभलेल्या साडेसात हजार किलोमीटर किनारपट्टीपैकी १० टक्के किनारपट्टी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील नैसर्गिक साधन संपत्ती, शेत माल, परदेशात पाठवण्यासाठी किंवा या मालासाठी लागणाऱ्या आणि आयात होणाऱ्या उपयुक्त वस्तु परदेशातून आणण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील बंदरे उपयुक्त आहेत. बंदरांचा विकास करण्यासाठी दिघी बंदर लिमिटेड या खाजगी कंपनी बरोबर होणारा करार महत्वाचा ठरणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. रेल्वे विकास निगमचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री आणि दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री हे रोहा - दिघी पोर्ट रेल्वे मार्ग जोडणी करारावर लवकरच स्वाक्षरी करणार आहेत.करारावर स्वाक्षरी करण्याच्या वेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा, रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद व राज्याचे परिवहन सचिव गौतम चटर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा होणारा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे.