शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भंगार व्यावसायिकांमुळे दिघावासियांचा कोंडतोय श्वास

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 20, 2023 21:03 IST

परिसरावर धुराचे लोट : धातुसाठी पेटवल्या जातात वायरी, उपकरणे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भंगार व्यावसायिकांकडून पेटवल्या जाणाऱ्या वायरी, टायर यासह इतर विद्युत उपकरणांमुळे दिघा एमआयडीसी तसेच चिंचपाडा परिसरावर धुरांचे लोट पसरत आहेत. रहिवासी भागात तसेच मोकळ्या जागेत चालणाऱ्या या प्रकारामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. त्यानंतरही शहरातील प्रदूषणात भर टाकणाऱ्या भंगावर व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईच्या प्रदूषणाची पातळी घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ठिकठिकाणी उग्र वास येण्याचे, डोळे जळजळ होण्याचेही प्रकार घडले होते. यानंतरही नवी मुंबईच्या प्रदूषणात सुधारासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसी क्षेत्रातील भंगार व्यावसायिकांकडून टायर, वायरी तसेच इतर विद्युत उपकरणे जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामधील धातू मिळवण्यासाठी रबरचे आवरण असलेले हे साहित्य जाळले जाते. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात धूर व उग्र वास परिसरात पसरत असतो. अशाच प्रकारे दिघा एमआयडीसी, चिंचपाडा लगत पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी लोकवस्तीला लागून व मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत.

रात्र होताच त्यांच्याकडून दिवसभर जमा झालेल्या वायरी, विद्युत उपकरणे पेटवून त्यामधील धातू काढण्याचे काम केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात टायर जाळले जातात. रहिवासी भागात ड्रम मध्येच टायर पेटवून हा प्रकार चालतो. त्यामुळे संध्याकाळ होऊ लागताच ठिकठिकाणी नागरिकांना उग्र वासाला व धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात वृद्ध व्यक्ती व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे. तर सततच्या उग्र वास व धुरामुळे काहींना श्वसनाचे त्रास देखील होऊ लागले आहेत. परंतु उघडपणे हा प्रकार चालत असतानाही स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेही त्याकडे लक्ष जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

सुस्त प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. भंगार व्यावसायिक टायर व इतर उपकरणे जाळत असल्याने त्याचा धूर रहिवाशी भागावर पसरत आहे. यामुळे अनेकांना ठसक्याचा त्रास होत असून सातत्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. वेळीच हा प्रकार न थांबल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. जगदीश गवते. माजी नगरसेवक. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई