शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

फलाट आणि डब्यातील अंतर ठरते आहे जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 01:20 IST

पश्चिम रेल्वेच्या स्थानकामध्ये येणाऱ्या सफाळे, डहाणू, वैतरणा, पालघर इ. स्थानकादरम्यान चालू झालेल्या लोकल सेवेत अनेक नवीन लोकल गाडयांच्या फेऱ्यांची भर पडत

डहाणू/सफाळे : पश्चिम रेल्वेच्या स्थानकामध्ये येणाऱ्या सफाळे, डहाणू, वैतरणा, पालघर इ. स्थानकादरम्यान चालू झालेल्या लोकल सेवेत अनेक नवीन लोकल गाडयांच्या फेऱ्यांची भर पडत असली तरी या स्थानकांचे फलाट व लोकलचे डबे यातील मोठे अंतर प्रवाशांसाठी जीवघेणे ठरते आहे. काही प्रवासी त्यामुळे पडून जायबंदीही झाले आहेत. विरार-डहाणू दरम्यान सुरू असलेल्या लोकल सेवेला अनेक नवीन लोकल्सची भर पडत आहे. मात्र वापरात येत असलेल्या फलाटाची उंची ही खूप जास्त आहे. या फलाटाची उंची ही शटल व एक्सप्रेस गाडयांच्या सोयी नुसार केलेली आहे. या शटल व एक्सप्रेस डब्यांना पायऱ्यांची सोय असल्याने ही उंची होती मात्र आता आता चालू झालेल्या लोकलंच्या डब्यांमधील व फलाटामधील अंतर खूप जास्त आहे कारण या नवीन लोकल गाडयांच्या डब्यांना उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय नसल्यामुळे प्रवाशांना, नोकरदारवर्गाला, विद्यार्थ्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागते.या जास्त अंतरामुळे वयोवृध्द लोकांना लोकलमध्ये चढणे-उतरणे मोठे जिकरीचे होत आहे. या अधिकच्या अंतरामुळे अनेकदा प्रवासी गाडीतून पडतात. काही जखमी होतात तर काही मरण पावतात अनेकदा गरोदर महिला या लोकल मधून प्रवास करत असतात. त्यांना यामुळे चढणे- उतरणे अगदी अशक्यच होते. या संपूर्ण परिस्थिती संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनसुध्दा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे व चिंतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)