शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

स्मार्ट सिटीच्या नावाखाली हुकूमशाही

By admin | Updated: December 10, 2015 01:43 IST

नवी मुंबई स्मार्ट सिटी होईल. त्याला आमचा विरोध नाही. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप पालिकांवर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई स्मार्ट सिटी होईल. त्याला आमचा विरोध नाही. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप पालिकांवर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे. एसपीव्ही प्रणालीमुळे लोकशाही संपुष्टात येणार असून, नगरसेवकांना आणि महापालिकेला काहीच अधिकार शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी व शहराचे नुकसान टाळण्यासाठी एसपीव्ही प्रणालीस विरोध केल्याची भूमिका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनी मांडली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंगळवारी स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी तयार केलेला प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळला. चार महिने स्मार्ट सिटी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले व आयत्या वेळी आठ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास विरोध केल्यामुळे शहरवासीयांनाही धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांमुळेच नवी मुंबई स्मार्ट सिटीमधून बाहेर पडली असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. याविषयी भूमिका स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. गणेश नाईक यांनी सांगितले, की स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपा सरकार हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत होते. महापालिका आयुक्तांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये विदेशी कंपनीबरोबर करार केला, त्याची साधी माहितीही महापौरांना व नगरसेवकांना देण्यात आली नव्हती. स्मार्ट सिटी स्पर्धेसाठीची तयारी करताना व आठ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करताना प्रशासनाने एसपीव्ही (स्पेशल पपज व्हेईकल) प्रणालीविषयी माहिती दिली नव्हती. एसपीव्ही प्रणाली म्हणजे दुसरी इस्ट इंडिया कंपनी आहे. यामध्ये लोकशाहीप्रणाली संपविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीसाठीचे प्रस्ताव तयार करणे, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पूर्णपणे एसपीव्हीच्या कमिटीकडे दिली जाणार होती. या कमिटीमध्ये आयुक्त, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी व इतर घटक असणार होते. नगरसेवकांना काहीच अधिकार राहणार नाहीत, हा लोकशाही मूल्यांचा अवमान आहे. प्रस्तावास मंजुरी दिली असती तर महापालिका बरखास्त केल्यासारखेच झाले असते. यामुळे आम्ही हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. यासाठी कर्ज घेण्यात येत होते. एसपीव्ही कमिटीला शहरात कर वाढ करण्याचे, पाणीबिलात वाढ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. निधी उभा करण्यासाठी कर्ज घेण्याचेही अधिकार त्यांनाच जाणार होते. ज्यांना या शहराशी काहीही देणेघेणे नाही त्यांनी कर्जाचा डोंगर उभा केला तर जाब कोणाला विचारायचा असा प्रश्न आहे. हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी प्रशासनाने सर्वांना अंधारात ठेवले. आम्ही दक्ष असल्यामुळे एसपीव्हीचा धोका लक्षात आला व आम्ही प्रस्तावास विरोध करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे शहराच्या हिताचाच असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, नेत्रा शिर्के, शंकर मोरे, शशिकांत राऊत उपस्थित होते.