शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाकण-खोपोली मार्गावर कामामुळे धुळीचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 23:45 IST

वाहनचालक, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात

- विनोद भोईर पाली : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाची रुंदीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. हे कामे सुरू असताना येथील मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक, व्यावसायिकांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत.मार्गावर वाकण ते पाली, रासळ, चिवे, परळी, दुधाणवाडी, उंबरे, शेबडी, मिरकुट वाडी ते पाली फाटा या ठिकाणी धुरळ्याची सर्वात अधिक समस्या आहे. मोटारसायकलस्वारांचे धुळीमुळे हाल होत आहेत.

या मार्गावरून जाताना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घातलेले असतानासुद्धा नाकातोंडात धूळ जाते. श्वसनाचे विकार असलेल्यांसह लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. तर धुरळा उडत असल्याने समोरून ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे.

पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. आता यावरून वाहने जाऊन येथून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना होत आहे, तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवासीही धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. हा धुरळा वाहनचालक आणि प्रवाशांच्या अंगावर सर्वत्र बसतो. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या धुळीमुळे हाल होत आहेत. वारंवार उडणारी धूळ खाद्यपदार्थ आणि वस्तूंवरही बसते. त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते.

हॉटेलमधील खाद्य पदार्थ, दुकानातील व घरातील वस्तू आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात. त्यामुळे या मार्गाचे काम जलद गतीने करण्याची मागणी व्यावसायिक, चालक व प्रवाशांकडून होत आहे. मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून माती बसण्यासाठी पाणीही टाकले जात नाही. जागोजागी मातीचे ढिगारे रचून ठेवले आहेत. या धुळीमुळे चालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना आणि परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक