शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनातील गटबाजीचे सभेत धिंडवडे

By admin | Updated: January 21, 2016 02:53 IST

महानगरपालिकेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील गटबाजीचे बुधवारी सर्वसाधारण सभेत धिंडवडे निघाले. राजकारण्यांपेक्षा जास्त

नवी मुंबई : महानगरपालिकेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील गटबाजीचे बुधवारी सर्वसाधारण सभेत धिंडवडे निघाले. राजकारण्यांपेक्षा जास्त राजकारण प्रशासनामध्ये सुरू आहे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. उपमहापौर अविनाश लाड यांनीही चुकीच्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला.आरोग्य विभागामधील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला आले होते. या प्रश्नावर वादळी चर्चा झाली. शिवसेनेचे एम.के. मढवी यांनी मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. प्रशासनामध्ये प्रचंड गटबाजी सुरू आहे. राजकारण्यांपेक्षा जास्त राजकारण सुरू आहे. काही अधिकारी महापालिकेमधील माहिती चोरून बाहेरील व्यक्तींना देत असून त्यामुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत असल्याचे मत व्यक्त केले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पदोन्नतीच्या विषयावर सुरू असलेल्या गोंधळाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. एम.के. मढवी यांनी घेतलेल्या आक्षेपांचीही शहानिशा करावी अशा सूचना प्रशासनास केल्या. डॉ. रमेश निकम यांच्यावर २००३ पासून अन्याय करण्यात आला. मागासवर्गीय संघटनेने नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचा प्रस्ताव मंजुरीला आणण्याचेही निदर्शनास आणून दिले. पदोन्नतीसाठी प्रशासनाने खोटी माहिती दिली आहे. तीनही अधिकाऱ्यांच्यासमोर त्यांच्याकडे कोणता कार्यभार आहे ते लिहिले आहे. परंतु ठरावातील उल्लेख व त्यांच्याकडील प्रत्यक्षामधील काम यामध्ये तफावत असल्याचे उपमहापौर अविनाश लाड यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)