शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’चा विकास आराखडाच मंजूर नाही

By admin | Updated: May 15, 2016 04:05 IST

नैना परिसराचा विकास आराखडा सिडकोने तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अद्याप त्यास मंजुरी मिळाली नसल्याने महानगर विभाग नगर नियोजन कायदा १९६६

नवी मुंबई : नैना परिसराचा विकास आराखडा सिडकोने तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अद्याप त्यास मंजुरी मिळाली नसल्याने महानगर विभाग नगर नियोजन कायदा १९६६ च्या अधीन राहून बांधकामांना परवानग्या द्याव्या लागत आहेत. शासनाने आराखडा मंजूर केल्यानंतरच या परिसराच्या विकासाला नवीन दिशा मिळणार आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये विस्तारलेल्या नैना प्रकल्पाच्या विकासामध्ये सिडको प्रेरकाची भूमिका बजावत आहे. विकासाला चालना मिळावी यासाठी शासनाने सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. सिडकोमुळे या परिसरामधील विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप विकासक करू लागले आहेत. परंतु प्रशासनाने हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. सिडकोने या परिसराचा अंतरिम विकास आराखडा तयार केला आहे. यामध्ये मूळ जमीनमालक एकत्र येऊन त्यांनी आपल्या जमिनीपैकी ४० टक्के भाग सिडकोला द्यावा, अशी तरतूद आहे. या बदल्यात सिडको पायाभूत सुविधा निर्माण करून देणार आहे. उर्वरित ६० टक्के जमिनीच्या विकासासाठी अतिरिक्त चटईक्षेत्र देण्यात येणार आहे. हा आराखडा शासनाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळेपर्यंत महानगर विभाग नगर नियोजन कायदा १९६६ च्या अधीन राहून परवानगी दिली जात आहे. शासनाने आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर विकास वेगाने होईल, असा दावा सिडको प्रशासनाने व्यक्त केले आहे. सिडकोमुळे नैनाच्या विकासामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. गत तीन वर्षांमध्ये सिडकोकडे २५१ विकासकांनी बांधकामांना परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले होते. नियमांची पूर्तता न केल्याने १४७ अर्ज फेटाळून लावले आहेत. १३ अर्जदारांनी मुळातच बेकायदा बांधकामे केली असल्याचे आढळून आले असून, त्यांचे अर्ज रद्द केले आहेत. नैना क्षेत्रामध्ये सिडकोप्रमाणे काही भागात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे सुद्धा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करीत असून, त्यांच्याकडे ४० अर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मंजुरीसाठी आलेल्या ३५ अर्जांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक रस्त्यांना जोडणारा व पुरेसा रुंद रस्ता नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय इतर अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. ११ अर्जदारांनी वाढीव चटईक्षेत्राची मागणी केली होती. परंतु त्यासाठी ते पात्र ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांच्या सातबारा उताऱ्यातील फेरफार व अर्जातील नोंदी यामध्ये मोठी तफावत आहे. साताबारामधील चुकीचे सर्व्हे नंबर किंवा खोटे सर्व्हे नंबर निदर्शनणास आले असल्याने १३ अर्ज फेटाळून लावले आहेत. मंजुरीसाठी पाठविलेले पाच अर्ज नैना क्षेत्रातील नव्हते, अशी माहिती सिडकोने दिली आहे. (प्रतिनिधी)