शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

पर्यायी आर्थिक शहर म्हणून नवी मुंबईचा विकास

By admin | Updated: September 4, 2014 23:18 IST

सायबर सिटीत शेजारच्या मुंबई शहरापेक्षा अधिक दर्जेदार सुविधा आहेत. या शहरात अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत.

नवी मुंबई : सायबर सिटीत शेजारच्या मुंबई शहरापेक्षा अधिक दर्जेदार सुविधा आहेत. या शहरात अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत. येत्या काळात यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईला पर्यायी ठरणारे आर्थिक शहर म्हणून नवी मुंबईचा विकास होत 
आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
सिडकोच्या माध्यमातून वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक्ङिाबिशन सेंटरचे (प्रदर्शन केंद्र) मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. तसेच नेरूळ येथे उभारण्यात येणा:या पत्रकार भवनच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते. तर प्रमुख पाहुणो म्हणून ठाण्याचे पालकमंत्री गणोश नाईक उपस्थित होते. या एक्ङिाबिशन सेंटरमध्ये देश-विदेशातील व्यापारी, उद्योगपती एकत्रित येतील. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. त्यातून अर्थकारणाला गती 
प्राप्त होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
व्हिडियोकॉनच्या काढून घेतलेल्या जमिनीवर गोरगरिबांसाठी घरे बांधावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी सिडकोला केली. सिडकोचा नयना प्रकल्प देशातील विकासाचे एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबई हे आता जुळे शहर राहिलेले नसून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आता एक्ङिाबिशन सेंटरमुळे या शहराचा नावलौकिक आणखी वाढणार आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून काढले. 
शहरात महाराष्ट्र भवन उभारण्याची सूचना त्यांनी सिडकोला केली. तसेच  गुजरात राज्याच्या विकासाचा मॉडेल फसवा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी पालकमंत्री गणोश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचीही भाषणो झाली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी आपल्या प्रास्ताविकातून सिडकोच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाला महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक, विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील, उपमहापौर अशोक गावडे, माजी खासदार संजीव नाईक, कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, महापालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
च्शहराचा विकास होत असताना येथील प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले गेले पाहिजेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने  घेतला आहे. तसेच सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची म्हाडाच्या धर्तीवर अडीच एफएसआयच्या माध्यमातून पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.