शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

द्रोणागिरीचा विकास दृष्टिपथात; पायाभूत सुविधांवर सिडकोचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:03 IST

विकासक, गुंतवणूकदारांना दिलासा

नवी मुंबई : विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या नोडच्या विकासावर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते, पदपथ, खेळाची मैदाने, उद्याने आदी अत्यावश्यक सुविधांची कामे हाती घेतली आहेत.वर्षभरापासून सुरू असलेल्या येथील विकासकामांची सिडकोच्या संबंधित विभागाने अलीकडेच पाहणी केल्याचे समजते. एकूणच सिडकोने हाती घेतलेल्या विकासकामांमुळे द्रोणागिरी नोडमधील विकासक आणि गुंतवणूकदारांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात असलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाबाबत सिडकोची भूमिका सुरुवातीपासूनच उदासीन राहिली आहे. मागील दहा वर्षांत सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, मेट्रो व नेरुळ-उरण रेल्वे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे द्रोणागिरीच्या विकासाचा मुद्दा मागे पडला. विशेष म्हणजे, या प्रस्तावित नोडमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.निविदा काढून अनेक भूखंडांची विक्री करण्यात आली आहे. यात शैक्षणिक, सामाजिक, निवासी आणि वाणिज्य भूखंडांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा नसल्याने या भूखंडांचा विकास होऊ शकला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत; परंतु सिडकोने आता द्रोणागिरीच्या विकासावर भर दिला आहे. पुढील वर्षभरात या विभागात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे.साडेबारा टक्के योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने वाटप केलेले भूखंड त्यामुळे विकासाला खीळ बसली. पायाभूत सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला ब्रेक बसला आहे. रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांअभावी विकासकामे ठप्प पडली आहेत. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. विकासकांनी महागड्या दराने घेतले भूखंड जैसे थे पडून आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासकांवर दिवाळखोरीचे संकट ओढावले आहे; परंतु व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम द्रोणागिरी नोडचा दौरा करून विकासकामाची पाहणी केली होती. त्यानंतर येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या, त्यामुळे विकासक आणि गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महागृहप्रकल्पातील अडीच हजार घरेसिडकोने गेल्या वर्षी १५ हजार घरांची योजना जाहीर केली. यात द्रोणागिरी नोडमध्ये दोन हजार घरांच्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. द्रोणागिरी सेक्टर ११ आणि सेक्टर १२ येथे अनुक्रमे मल्हार गृहसंकुल आणि भूपाळी गृहसंकुल अशी या दोन गृहप्रकल्पांची नावे आहेत. या प्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना २०२० मध्ये घरांचे वाटप केले जाणार आहे, त्यानुसार या विभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे.

टॅग्स :cidcoसिडको