शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नदीकिनाऱ्यावरही विकासकांचा डोळा

By admin | Updated: May 15, 2016 04:10 IST

नैना परिसरामधील २३ गावांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. पनवेल शहराला लागून असलेल्या या परिसरामधून गाढी नदीही धावते.

नामदेव मोरे, नवी मुंबई नैना परिसरामधील २३ गावांचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. पनवेल शहराला लागून असलेल्या या परिसरामधून गाढी नदीही धावते. विकासाचे नियोजन करताना नदीचे पात्र व त्याच्या बाजूला पुरेशी मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. तत्काळ हद्द निश्चिती केली नाही तर पात्रामध्येही अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडको कार्यक्षेत्रामध्ये विकासासाठी अत्यंत कमी जमीन शिल्लक आहे. भविष्यात या परिसरामध्ये विमानतळ येणार असल्याने विकासासाठी प्रचंड संधी निर्माण होणार आहे. भविष्यात या परिसराला प्राप्त होणारे महत्त्व वेळेत लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी नैना प्रभावित क्षेत्रामधील हजारो एकर जमीन विकत घेतली आहे. काही मोठ्या उद्योजकांनी १०० ते ३०० एकर जमीनही खरेदी करून ठेवली आहे. १५ वर्षांपासून अनेकांनी या परिसरामध्ये इमारतींचे बांधकाम करण्यासही सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेऊन अनेकांनी प्रकल्प उभारले. काहींनी परवानगी न घेताच प्रकल्प उभे केले आहेत. जमिनीला सोन्याची किंमत आल्याने एक इंचही जागा विकासक फुकट सोडण्यास तयार नाहीत. देहरंग धरणापासून गाढी नदी नैना परिसरामधून खाडीमध्ये जाऊन मिळते. निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे नदीकिनाऱ्यावर इमारती किंवा टाऊनशिप उभारण्याचे नियोजन अनेक व्यावसायिकांनी केले आहे. नदीच्या परिसरामध्ये विकासकामांना परवानगी देण्यापूर्वी प्रथम नदीचे पात्र निश्चित करण्यात यावे. मुसळधार पावसाच्या वेळी नदीचे पाणी जिथपर्यंत असते त्यापासून काही मीटर अंतर सोडूनच परवानगी देणे आवश्यक आहे. परंतु अद्याप याविषयी ठोस भूमिका दिसत नाही. यामुळे १० वर्षांत नदीच्या पात्राला लागूनच मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. भविष्यात २६ जुलै २००५ प्रमाणे अतिवृष्टी झाल्यास हा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे. नैना परिसरातील पहिल्या टप्प्यामधील आकुर्ली, बोर्ले, चिपले, कोप्रोली, पळस्पे, पालीदेवद, उसर्ली खुर्द, विचुंबे, विहीघर या गावांमधील जमीन नदीच्या किनारी आहे. याशिवाय देहरंग धरणापर्यंत असणाऱ्या गावांमध्येही बांधकाम व्यावसायिकांनी जमीन खरेदी करून ठेवली आहे. पनवेलमधील वडघर, विचुंबे, सुकापूर या परिसरामध्ये नदीच्या काठावर बांधकामे झाली आहेत. काठाला लागून व काही ठिकाणी नदीपात्राशेजारी संरक्षण भिंत बांधून बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. १० वर्षात सातत्याने नदीच्या बाजूला गृहप्रकल्प उभारले जात आहेत.