शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकावर सोमवारी होणार शिक्कामोर्तब

By admin | Updated: February 10, 2017 04:40 IST

बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकावर बुधवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अंतिम आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत

कमलाकर कांबळे, नवी मुंबई बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकावर बुधवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अंतिम आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत १३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे सोमवारी पात्र ठरलेल्या चारपैकी किती कंपन्या निविदा सादर करतात, त्यावर विमानतळाचा विकासक ठरणार आहे. असे असले तरी चारपैकी दोन ते तीन कंपन्या निविदा प्रक्रियेत भाग घेतील, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. दरम्यान, निविदा सादर करण्यासाठी दिलेली ही अंतिम मुदत असल्याने सोमवारी विमानतळाचा विकासक कोण? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निविदा सादर करण्यासाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झ्युरिच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांकडून अंतिम आर्थिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. ९ जानेवारी, २0१७ ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत मुंबई विमानतळाचे परिचालन करणाऱ्या जीव्हीके या कंपनीची एकमेव निविदा सिडकोला प्राप्त झाली होती. तर दिल्ली विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीएमआर कंपनीने विविध कारणे पुढे करीत या प्रक्रियेतून माघार घेतली होती. उर्वरित हिरानंदानी व टाटा या दोन कंपन्यांनीही निविदा सादर करण्यास नकारात्मक रोख दर्शविला होता. त्यामुळे ९ जानेवारीनंतर आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेणाऱ्या सिडकोने निविदा स्पर्धात्मक असाव्यात. त्याद्वारे उत्तम अटी व शर्तीवर विमानतळाचे काम व्हावे, यादृष्टीने निविदा सादर करण्यासाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली. ही मुदत सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. या मुदतीत पुन्हा जीव्हीके कंपनीकडून निविदा सादर होण्याची शक्यता आहे. तसेच जीएमआर व हिरानंदानी- झ्युरिच या दोन कंपन्याही निविदा सादर करतील, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. तर मागील काही महिन्यांत घडलेल्या अंतर्गत घडामोडीमुळे टाटा रियालिटी ही कंपनी निविदा भरण्यास फारशी उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित जीव्हीके, हिरानंदानी आणि जीएमआर या तीनपैकी एक कंपनीची निवड विमानतळाचा विकासक म्हणून होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. या मुदतीत प्राप्त होणाऱ्या निविदांपैकी सर्वोत्तम निविदा सादर करणाऱ्या कंपनीला विमानतळाच्या उभारणीचे व परिचालनाचे काम मिळणार आहे. या स्पर्धेत जीव्हीके कंपनीच बाजी मारेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.