शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम सिटीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:04 IST

तळोजा एमआयएडीसीमधील दूषित पाणी कोपरा खाडीत सोडले जाते.

पनवेल : खारघर हे सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पारसिक डोंगराच्या कप्यात, नैसर्गिक सानिध्यात वसलेल्या या शहरात सिडकोने अत्याधुनिक दर्जाचे प्रकल्प राबविले आहेत, त्यामुळे राहण्यास सुयोग्य शहर म्हणून सर्वाधिक खारघरला पसंती दिली जाते; परंतु दुर्दैवाने हा लौकिक टिकविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कारण मागील काही दिवसांपासून शहराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. उग्रवास, हवेतील धूलिकण आदीमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या प्रदूषणाच्या विरोधात खारघरवासीयांनी संघर्ष सुरू केला आहे.

तळोजा एमआयएडीसीमधील दूषित पाणी कोपरा खाडीत सोडले जाते. या दूषित पाण्यामुळे पाणीप्रदूषण तर होतेच, शिवाय रात्रीच्या वेळेला उग्र वास येत आहे. हवेत धूलिकण वाढल्याने दिवसाही श्वास घेताना त्रास होत आहे. ही परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात अनेकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. सिडकोसह पनवेल महापालिकेलाही या संदर्भात वेळोवेळी माहिती देण्यात आली. तळोजा येथील प्रदूषणकारी कारखान्यांमुळे ही समस्या उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वस्तुस्थिती समोर असतानाही संबंधित प्राधिकरणांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या खारघरवासीयांनी रविवारी सिडको, एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विरोधात मोर्चा काढून निषेध नोंदविला. खारघर कॉलनी फोरमच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आपल्या हातातून बनविलेल्या संदेशात्मक फलकांच्या द्वारे होणाºया त्रासाची माहिती दिली. अबालवृद्धांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. खारघरमधील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्र ांत पाटील, महिला व बाल कल्याण सभापती रीना गरड, तळोजामधील प्रदूषणासंदर्भात हरित लवादामध्ये धाव घेतलेले नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अर्जुन गरड, बालेश भोजणे, संतोष तांबोळी, अमर उपाध्याय आदीसह हजारो रहिवासी यात सहभागी झाले होते.

शहरातील प्रदूषणावर वेळीच कार्यवाही झाली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या वेळी दिला. तसेच या प्रदूषणामुळे होणाºया दुष्परिणामाची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. विशेष म्हणजे, हरित लवादानेही येथील प्रदूषणासंदर्भात एमआयडीसी, तसेच संबंधित यंत्रणेला दोषी ठरविले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही संबंधितांवर कारवाई होत नसल्याची खंत त्यांनीव्यक्त केली. रहिवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबविला नाहीत, तर भविष्यात ही समस्या आणखी तीव्र होईल, असा इशारा नगरसेविका रीना गरड यांनी दिला.माकडांच्या शिल्पावर उपहासात्मक टीकाखारघर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ हिरानंदानी उड्डाणपुलाजवळ सिडकोने तीन माकडांचे शिल्प उभारले आहे. नागरिकांना संदेश देणाºया तीन माकडांच्या मागे उपहासात्मक तीन माकडांचे बॅनर्स रहिवाशांनी तयार केले होते.या तीन माकडांमध्ये एमआयडीसी, सिडको व एमपीसीबी यांची नावे देण्यात आली होती. काहीही न करता ही तीन माकडे मूग गिळून गप्प बसल्याची उपहासात्मक टीका या वेळी करण्यात आली.