शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटली, ग्राहकांनीही फिरविली पाठ; बंद मागे घेवूनही बाजार समितीमध्ये शुकशुकाट

By नामदेव मोरे | Updated: December 14, 2023 16:57 IST

दिवसभरात फक्त ३५ टक्केच आवक.

नामदेव मोरे,नवी मुंबई : माथाडी कामगारांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली परंतु शेतकऱ्यांपर्यंत वेळेत संदेश न पोहचल्यामुळे गुरूवारी बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट होता. दिवसभरात ३५ टक्केच आवक झाली. ग्राहकही मार्केटकडे फारसे फिरकले नसल्यामुळे अघोषीत बंदची स्थिती निर्माण झाली होती.

माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती. ४ डिसेंबरला पत्रकार परिषद घेवून बंदचा इशारा दिला होता. यामुळे मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी कृशी माल न मागविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु १३ डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण याविषयीची माहिती राज्यातील शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहचू शकली नाही. यामुळे गुरूवारी मार्केट सुरू असूनही फारशी आवक होऊ शकली नाही. बुधवारी पाच मार्केटमध्ये मिळून १६८८ वाहनांची आवक झाली होती. गुरूवारी ही संख्या फक्त ५४४ एवढीच होती.

 पुरेशी आवक झाली नसल्यामुळे कांदा बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती. आवक कमी झाली असली तरी बाजारभावांवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शुक्रवारी मार्केट सुरळीत सुरू राहील असेही स्पष्ट केले आहे.

कांदा दरात घसरण :

बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये घसरण सुरू आहे. बुधवारी १५६४ टन कांद्याची आवक झाली होती. होलसेल मार्केमध्ये २३ ते ३६ रुपये दर मिळाला होता. गुरूवारी २०० टनच आवक झाली असून बाजारभाव १९ ते २९ वर आली आहे. शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ही घसरण सुरू असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती