शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रसिद्ध प्रबळमाची प्राथमिक सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 23:45 IST

पनवेलमधील प्रबळगड व कलावंतीण दुर्गला दरवर्षी जगभरातील २० ते २५ हजार पर्यटक भेट देत असतात.

- नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेलमधील प्रबळगड व कलावंतीण दुर्गला दरवर्षी जगभरातील २० ते २५ हजार पर्यटक भेट देत असतात. ५०० वर्षांचा इतिहास असलेल्या गडाच्या परिसरातील प्रबळमाची हे गाव मात्र अद्याप सुविधांपासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर डोंगरातून पायपीट करावी लागत आहे. अद्याप गावापर्यंत पक्का रस्ता झालेला नाही. विद्युत पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही.

रुग्णांना डोलीत घालून रुग्णालयात घेऊन जावे लागत असून, ग्रामस्थांची ही स्थिती पाहून पर्यटकही हळहळ व्यक्त करू लागले आहेत.  रायगड जिल्हातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये समावेश असलेल्या कलावंतीन दुर्ग व प्रबळगड परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. पनवेलपासून जवळ असलेल्या प्रबळमाची गावात जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही. ठाकूरवाडीपासून जवळपास तीन किलोमीटर पायपीट करून गावात जावे लागत आहे. दोनशेपेक्षा जास्त लोकवस्ती गावात आहे.

ग्रामस्थांना किराणा मालासह सर्व वस्तू डोक्यावरून घेऊन जावे लागत आहे. बांधकाम व इतर साहित्याचीही डोक्यावरून वाहतूक करावी लागते. गावामध्ये कोणी आजारी पडले, तर डोलीत घालून त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागते. एखादा पर्यटक जखमी झाला किंवा अजारी पडला, तरी त्यालाही डोलीत घालून पायथ्यापर्यंत आणावे लागत आहे. गावामध्ये विजेची सुविधा आहे, परंतु होल्टेज कमी असल्यामुळे पुरेसा प्रकाश पडत नाही. ग्रामस्थांना योग्य दाबाने वीजपुरवठा करणे आवश्यक असून, त्यासाठी सबस्टेशन व इतर कामे करणे आवश्यक आहे. 

प्रबळमाची गावात पूर्वी जिल्हा परिषदेची शाळा होती, परंतु डोंगरावर शिक्षक वेळेत येत नसल्यामुळे व इतर अडचणींमुळे शाळा बंद झाली आहे. पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेत पाठवावे लागत आहे. गावातील गैरसोयी पाहून पर्यटकही हळहळ व्यक्त करू लागले आहेत. प्रबळमाची गावापर्यंत रस्ता व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडूनच केली जात आहे. रस्ता झाला, तर ग्रामस्थांना सर्व साहित्याची डोक्यावरून वाहतूक करावी लागणार नाही. यामुळे शासनाने रस्ता लवकरात लवकर करावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई