शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पगार महापालिका कर्मचा-यांच्या खात्यात जमा, भरती प्रक्रियेत अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 05:20 IST

पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील ३८४ कामगारांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील ३८४ कामगारांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या कामगारांना पालिका राबवून घेत असून त्याचा मोबदला देणे अनिवार्य असताना त्यांचा पगार रोखून धरला जात असल्यामुळे कामगार सामूहिक सुटीच्या तयारीत होते. अखेर या पगारासंदर्भात तोडगा निघाला असून या कामगारांना पगार देण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिल्यानंतर गुरुवारी कामगारांच्या खात्यावर पगार जमा झाला आहे.कामगारांमध्ये लिपिक, सफाई कामगार, प्लंबर, शिपाई, लेखनिक, स्वच्छता कर्मचारी, अभियंता आदींसह अनेक प्रकारच्या कामगारांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कामगारांचे पगार रखडले असल्याने अनेक कामगार चिंतेत होते. यासंदर्भात शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील कामगारांसोबत बैठक घेतली होती. मंगळवारी यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची कोकण आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी याच दिवशी या कर्मचाºयांच्या संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी देखील कोकण आयुक्तांची भेट घेऊन कामगारांचा थकीत प्रश्न त्यांच्या समोर मांडला होता. अखेर कर्मचाºयांना पगार मिळाले असून यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १ कोटी ७९ लाखांचा बोजा पडणार आहे. दरम्यान, या कामगारांना पालिकेत सामावून घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नसून २९ आॅगस्ट रोजी कोकण विभागीय आयुक्तांसोबत पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे.