शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये आढळले डेंग्यूचे रुग्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 02:37 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. महापालिकेने शहरात सक्षम यंत्रणा राबविण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.पनवेल शहरात डेंग्यूचे सात रु ग्ण आढळल्याची चर्चा आहे. नुकतेच परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला असून, त्या रुग्णाला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात शेकापने आक्र मक भूमिका घेत डेंग्यू निवारणासंदर्भात विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी शेकाप नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, माजी नगरसेवक डी. पी. म्हात्रे, रोहण गावंड या कार्यकर्त्यांनी पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना सोबत घेऊन परदेशी आळीमध्ये स्वत: धुरीकरण तसेच फवारणी केली.शहरातील डेंग्यूच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. या पथकात आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, पालिकेचे कर्मचारी आदीचा समावेश असावा. पथकाच्या कामकाजावर उपायुक्त अथवा आयुक्तांचे नियंत्रण असावे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.पनवेल शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या बाबतही पालिकेने योग्य उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.>सापडलेले रु ग्ण हे डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यू तसेच साथीचे आजार निवारणासाठी सर्वच प्रकारच्या उपाययोजना राबविल्या आहेत. शनिवार, २१ जुलैपासून जवळ जवळ ४०० सोसायट्यांना नोटीस पाठवून घरात किंवा परिसरात उघड्यावर पाणी साठवून ठेवू नये, अशी विनंती करणार आहोत. शहरात उघड्यावर ठेवलेले टायर्स तसेच पाणी साचणाऱ्या विविध वस्तू जप्त करण्यासाठी देखील मोहीम हाती घेतली जाणार आहे.- संजय जाधव,स्वच्छता निरीक्षक, पनवेल महापालिका