शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

स्पॅगेटी प्रकल्पातील इमारतीला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:55 IST

कामाच्या दर्जाबाबत शंका : स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची रहिवाशांची मागणी

वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : सिडकोने उभारणी केलेल्या खारघर सेक्टर १५ मधील स्पॅगेटी हौसिंग सोसायटीच्या पिलरला तडे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी के ४ बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील सज्जा अचानक कोसळला. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सदनिकांचा ताबा घेऊन पंधरा वर्षे झाले आहेत. मात्र या काळात इमारतींना अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यामुळे रहिवासी चिंतेत आहेत.

२००५ मध्ये रहिवाशांनी स्पॅगेटीतील गृहप्रकल्पाचा ताबा घेतला. या ठिकाणी गृहप्रकल्पात जे, के, एल, एम अशा चार विंग आहेत. चार विंगमध्ये एकूण १८ इमारती असून एकूण ४५६ सदनिका आहेत. सध्याच्या घडीला हजारो रहिवासी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र एवढ्या कमी वेळात इमारतींच्या पिलरला तडे गेल्याने रहिवासी कामाच्या दर्जाबाबत संभ्रमात आहेत.

सिडकोने गृहप्रकल्प उभारताना रहिवाशांना विविध आश्वासने दिली होती. त्यामध्ये कामाचा दर्जा ही महत्त्वाची बाब होती. मात्र इमारतींच्या पिलरला ठिकठिकाणी तडे गेल्याने २०१२ मध्ये स्पॅगेटी को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमार्फत सिडकोसोबत पत्रव्यवहार केले होते. या वेळी सिडकोने स्ट्रकवेल डिझायनर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तात्पुरत्या स्वरूपात तडे बुजविण्याचे काम दिले होते. हे काम पूर्ण झाल्यावर अवघ्या सात वर्षांत पुन्हा एकदा स्पॅगेटी सोसायटीतील इमारतींच्या पिलरला तडे गेल्याने रहिवाशांनी सोमवारी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून दखल घेण्याची विनंती केली आहे.

गृहप्रकल्पाच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून यापूर्वीही रहिवाशांनी ही मागणी केली होती. मात्र सिडकोकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्पॅगेटी सोसायटीचे सचिव यशवंत देशपांडे यांनी केला.

सिडकोच्या निकृष्ट बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरसिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची उभारणी करण्यात आली. वसाहती उभारण्यात आल्या. परंतु सिडकोच्या माध्यमातून बांधलेल्या इमारती अल्पावधीतच निकृष्ट ठरल्या. अवघ्या पंधरा-वीस वर्षांत या इमारतींची पडझड सुरू झाली. अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. प्लास्टर निखळण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत.ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळ, सीबीडी, कळंबोली, नवीन पनवेल आदी भागांतील सिडकोनिर्मित इमारतींची दुरवस्था झाली आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे चर्चिला जात आहे. पूर्वीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत ओरड असतानाही सिडकोने त्यानंतर उभारलेल्या बांधकाम प्रकल्पांचा दर्जा सुधारला नाही.२००५ मध्ये म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी खारघर येथे उभारलेल्या स्पॅगेटी गृहप्रकल्पातील इमारतीलासुद्धा तडे गेल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने येत्या काळात जवळपास दोन लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवले आहे. या प्रस्तावित गृहप्रकल्पांच्या उभारणीत तरी सिडकोने बांधकामांचा दर्जा राखावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको