शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत एसटी बस आगाराची मागणी

By admin | Updated: April 28, 2017 00:42 IST

कोकण आणि महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या एसटीच्या बसेस नवी मुंबई परिसरातूनच मार्गक्रमण करतात. मात्र या एसटी प्रवाशांना

नवी मुंबई : कोकण आणि महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या एसटीच्या बसेस नवी मुंबई परिसरातूनच मार्गक्रमण करतात. मात्र या एसटी प्रवाशांना मूलभूत सेवा पुरविल्या जात नसल्याची नाराजी शेकापच्या शिष्टमंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी या शिष्टमंडळाने राज्य मार्ग परिवहन मंडळाला भेट देत प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी करत निवेदन सादर केले.नवी मुंबई परिसरातील बहुसंख्य नागरिक एसटीने प्रवास करत असूनही याठिकाणी असलेल्या एसटी थांब्यांवर मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची तक्रारही शेकापच्या शिष्टमंडळाने केली आहे. नवी मुंबईत एसटीचे आगार सुरू करून त्याठिकाणी प्रवाशांकरिता मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य महामार्ग परिवहन मंडळाची भेट घेऊन प्रवाशांच्या गैरसोयी निदर्शनास आणल्या. एसटी बस थांब्यावर शेड्स, पाणपोई अशा मूलभूत सुविधा तसेच शहरात एसटी आगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देओल यांनी दिले. यावेळी शेकापचे ठाणे लोकसभा विभाग अध्यक्ष अ‍ॅड. मंदार मोरे, जिल्हाध्यक्ष गौतम आगा, किसन संकपाळ उपस्थित होते.