शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात, योग्य पावले उचलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:44 IST

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६ मध्ये अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात पडल्या आहेत.

पनवेल : पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६ मध्ये अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या कच-यापासून खतनिर्मिती करणा-या मशिन धूळखात पडल्या आहेत. विशेष म्हणजे लाखो रुपये किमतीच्या या मशिन पनवेल महानगरपालिकेने देखील वापरात आणल्या नसल्याने प्रभाग क्र मांक सहामधील नगरसेविका संजना कदम यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित करीत पालिका प्रशासनाने योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे.पनवेल महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच खारघर, पनवेल शहरात सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे जनप्रबोधनापर कार्यक्र म पार पडले. १ डिसेंबरपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १०० किलो वजनाचा रोजचा कचरा निर्माण करणाºया सोसायटीचा वर्गीकरण न केलेला कचरा उचलणार नसल्याचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, एकीकडे कचºयापासून खतनिर्मिती करणारे लाखो रु पयांचे मशिन पालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. खतनिर्मिती करणाºया या मशिनची किंमत प्रत्येकी दहा लाखांच्या घरात असल्याचे समजते. प्रभाग क्र मांक सहा हा खारघर सेक्टर १५ आणि १६ ला जोडलेला आहे. सिडकोने वसवलेल्या स्पॅगेटी, घरकूल, वास्तुविहार या वसाहतींचा यामध्ये सहभाग आहे. या सोसायट्यांमधून दररोज हजारो किलो कचरा बाहेर पडत आहे. त्यादृष्टीने या कचºयाच्या मशिन कार्यान्वित केल्यास पालिकेचा मोठा फायदा होणार आहे. कचरा उचलण्यासाठी लागणाºया लाखो रु पयांच्या निधीची बचत यामुळे होणार आहे. सध्याच्या घडीला या चार मशिन स्पॅगेटी आणि वास्तुविहार सोसायटीत ठेवण्यात आल्या आहेत.यासंदर्भात महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी सांगितले की, संबंधित मशिन या तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीने ठराव करून विकत घेतल्या होत्या. त्यानंतर या मशिन सेक्टर १५ मध्ये विविध सोसायट्यांना वितरित केल्या आहेत. सोसायट्यांनी त्या मशिन वापरात आणल्या नाहीत. सोसायट्या त्या मशिन वापरणार नसतील तर पालिकेकडे पुन्हा हस्तांतरित कराव्यात, आम्ही त्या मशिन कार्यान्वित करू.घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्रभाग क्र मांक २ चे नगरसेवक पुढाकार घेऊन आपल्या प्रभागात सुमारे १२ लाख रु पये खर्चून दोन मशिन विकत घेतल्या. ओला व सुक्या कचºयावर प्रक्रि या करून त्यातून खत निर्मिती करण्याचा स्तुत्य उपक्र म सुरु केला.आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील या प्रकल्पाला भेट दिली. मात्र पालिकेच्या मार्फत कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने अरविंद म्हात्रे यांनी महिनाभराच्या आतच हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत ही माहिती त्यांनी सभागृहात दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई