शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हवेच्या दर्जाचे मापन व परीक्षण करणारी मॉनिटरिंग स्टेशन्स बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 00:47 IST

Panvel : तळोजा एमआयडीसी या पनवेल महापालिकेच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांद्वारे सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे.

पनवेल : टाळेबंदीचे नियम शिथिल होताच हवेच्या गुणवत्तेत कमालीची घसरण दिसून येत आहे. विशेषतः खारघर, तळोजा आणि पनवेल या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशांना पुन्हा एकदा प्रदूषित हवेमुळे आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या भागात हवेच्या दर्जाचे मापन व परीक्षण करण्यासाठी एअर मॉनिटर्स बसविण्याची गरज असल्याने तशा आशयाचे पत्र वातावरण फाउंडेशनद्वारे पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आले आहे.तळोजा एमआयडीसी या पनवेल महापालिकेच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांद्वारे सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. उग्र वासाने आणि श्वास कोंडणारे विषारी वायू बाहेर पडत असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार महाराष्ट्रातील एकूण १८ शहरे ही हवेची गुणवत्ता गाठू न शकणारी शहरे आहेत. या १८ शहरांपैकी नवी मुंबई हे राज्यातले सर्वाधिक प्रदूषित शहर असून ग्लोबल एअर व्हिज्युअल रिपोर्टनुसार नवी मुंबईचा वायुप्रदूषणाच्या बाबतीत जगात ५१ वा क्रमांक लागतो. देशभरातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र हे राज्य हवा प्रदूषणाच्या बाबतीत अव्वल असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खारघर, तळोजा फेज-१, फेज-२, नावडे, कळंबोली, कामोठे, रोडपाली या भागात हवेच्या दर्जाचे मापन व परीक्षण करणारी मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याची गरज असल्याचे वातावरण फाउंडेशनचे अध्यक्ष भगवान केशभट यांनी सांगितले. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

-   कोविड-१९ आणि हवा प्रदूषण यांच्यात परस्परसंबंध दर्शविणारा आंतरराष्ट्रीय अभ्यास ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने’ही स्वीकारला. त्यामुळे हवा प्रदूषणामुळे नवी मुंबईतील जनतेचे होणारे हाल याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत वातावरण फाउंडेशनचे सदस्य राहुल सावंत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :panvelपनवेल