शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर गावांचा विकास खुंटला;सिडको-पालिकेची सुकाणू समिती स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:32 IST

पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण या पालिकेत करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात पालिकेच्या मार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण या पालिकेत करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात पालिकेच्या मार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेली ग्रामपंचायतच बरी होती, असा सूर उमटत असल्याने गावांच्या विकासाकरिता सिडको पालिकेची सुकाणू समिती स्थापन करण्याची मागणी पनवेल तालुका विकास मंडळाच्या वतीने आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.सिडको उभारत असलेल्या दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पात पनवेल महानगरपालिकेतील काही भागांचा समावेश आहे. मात्र, स्मार्ट सिटी उभारत असताना ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वास्तविक पाहता पनवेल महानगरपालिकेपूर्वी स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फतही त्याठिकाणच्या स्थानिक गावांच्या विकासाकरिता पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन झाली असली, तरी संपूर्ण पालिका क्षेत्रातील विकासाकरिता आवश्यक बजेट पालिकेकडे नाही. यापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती प्रस्ताव तयार करून सिडकोकडे पाठवून गावातील विकासकामे करून घेतली जात असत. मात्र, सध्याच्या घडीला पूर्णपणे बदल झाला असून, सिडको गावांच्या विकासाची जबाबदारी आपल्याकडून झटकत आहे, तर पालिकाही उदासीन असल्याचे पनवेल तालुका विकास समितीचे अध्यक्ष भरत पाटील यांनी पत्राद्वारे आयुक्तांना कळवले आहे.स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पालिका क्षेत्रातील गावामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याची विनंती भरत पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई