शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

गर्भवतीच्या उपचारात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:28 IST

घणसोली येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेची पुरेशा पैशाअभावी फरफट चालू आहे.

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या गर्भवती महिलेची पुरेशा पैशाअभावी फरफट चालू आहे.शीतल धेंडे या आठ महिन्यांच्या गर्भवती असून, त्यांना सिझर करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. मात्र, वाशीच्या मनपा आणि नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता शिशू विभागात जागा नाही, तसेच ऐरोली व नेरुळमधील रु ग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू नसल्याने या गर्भवती महिलेची फरफट होत आहे. सिझर झाल्यानंतर कमीत कमी एक महिना बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे असल्याने खासगी रुग्णालयाचा लाखो रुपयांचा खर्च पेलवण्याची ताकद नसल्यामुळे ते दाम्पत्य हादरून गेले आहे.मनपाची तीन तीन रु ग्णालये असताना नेरु ळ व ऐरोली येथील १०० बेडची रु ग्णालये चार वर्षे पूर्ण होऊनही पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. तसेच ऐरोली येथील रुग्णालयात तर आजतागायत आॅक्सिजन लाइन टाकण्यात टाकण्यात आली नाही. तर वाशी येथील प्रथम संदर्भ रु ग्णालयात असलेला अतिदक्षता विभाग योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे कधी चालू तर कधी बंद असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने याची योग्य ती दखल घेऊन गरजू व गरीब लोकांची व्यथा जाणावी, असे धेंडे कुटुंबाला मदत करणाºया गणेश सकपाळ यांनी सांगितले. याबाबत वाशी रुग्णालयाचे अधीक्षक प्रशांत जवादे यांना विचारले असता,शिशू अतिदक्षता विभागातील बेड रिकामे नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महिलेच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.