शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

बोगस घरवाटप प्रकरणात तक्रारीला विलंब

By admin | Updated: August 30, 2016 03:15 IST

नेत्यांच्या कोट्यातून बिगर माथाडींना घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त होऊनही युनियनने संबंधितांविरोधात गुन्हा का दाखल केला नाही

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई नेत्यांच्या कोट्यातून बिगर माथाडींना घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त होऊनही युनियनने संबंधितांविरोधात गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. युनियनचा पदाधिकारीच युनियनचे पत्र दाखवून घरांची हमी देत असल्यामुळे अनेक जण त्याच्या जाळ्यात अडकत होते. त्यानंतरही युनियनकडून वेळीच ठोस निर्णय न झाल्याच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियनच्या कर्मचाऱ्याकडून गेली दीड वर्षापासून बोगस घरांच्या वाटपाचे रॅकेट चालवले जात होते. यामध्ये इतरही काही प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्षात माथाडींची घरे शिल्लक नसतानाही हा प्रकार सुरु होता. नेत्यांसोबत असलेल्या संबंधातून विश्वास संपादित करून घरांचे आमिष दाखवून दिलीप यादव याने युनियन कार्यालयातच अनेकांकडून लाखो रुपये स्वीकारल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तर घरासाठी त्याच्याकडे पैसे देणाऱ्यांमध्ये बिगर माथाडींसह काही माथाडी कामगारांचा देखील सहभाग असल्याचे समजते. त्यामुळे या रॅकेट मध्ये युनियनचे इतरही काही पदाधिकारी अथवा कर्मचारी यादवच्या पाठीशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच यादवविरोधात तक्र ार करून देखील युनियनने वेळीच त्याच्याविरोधात ठोस कारवाई न केल्याचा त्यांचा आरोप आहे. २१ एप्रिल २०१६ रोजी काही व्यक्तींनी युनियनकडे यादव विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत युनियनने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करणे आवश्यक होते. शिवाय झालेल्या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र तसे न होता युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारदारांची बैठक घेऊन यादवने घेतलेले पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याकरिता यादवच्या कुटुंबीयांसोबत तक्रारदारांची बैठक देखील घडवून आणण्यात आली होती. त्यावेळी यादव याने घेतलेली रक्कम परत देण्याची जबाबदारी त्याचाच नातेवाईक संतोष चव्हाण याने घेतली होती. पोपटराव देशमुख यांनी घडवून आणलेल्या या बैठकीला माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते अशी तक्रीरीत नोंद आहे. त्यानंतरही अनेक बैठका होऊन देखील युनियनकडून यादव विरोधात ठोस पाऊल उचलले गेले नाही. शिवाय याच कालावधीत यादव हा देखील नवी मुंबईतून बेपत्ता झाल्यामुळे, नेत्यांच्या आश्वासनांना न भुलता त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यादवने जमा केलेल्या कोट्यवधींच्या रोख रकमेची त्याला एकट्याला विल्हेवाट लावणे सहज शक्य नाही. त्यामुळे मध्यस्थामार्फत ती रक्कम इतर कोणापर्यंत पोच झाली आहे का याचाही उलगडा होण्याची आवश्यकता आहे.