शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देहरंग धरणाची गळती बंद

By admin | Updated: July 5, 2016 02:21 IST

पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात गाळ साचल्याने पाणी क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे

- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली

पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात गाळ साचल्याने पाणी क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार धरणातील गळती बंद करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने दररोज किमान दीड ते दोन एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता देहरंग धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या धरणात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा विचार करता भविष्यात परिसराची तहान वाढणार आहे. देहरंग धरणात गाळ बसला असून गळतीही लागल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात धरण लवकर कोरडे पडते. यंदा पाटबंधारे खात्याकडून धरणाच्या सुरक्षेबाबत लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी पाणीबचत व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणाची गळती थांबविण्याची सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गळती थांबविण्याचे काम हाती घेतले.दोन महिन्यांपासून गळती बंद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे धरणाची सुरक्षितता अबाधित राहीलच त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टळेल, असा विश्वास पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर.आर. तायडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.