शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

खारघर स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:47 IST

लाकडांअभावी अंत्यविधीसाठी जावे लागले बेलापूरला; सिडकोच्या निष्काळजीपणाविषयी नागरिकांमध्ये संताप

- वैभव गायकरपनवेल : खारघर शहरातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना शहराबाहेर अंत्यविधी करावा लागत आहे. एकीकडे खारघर शहर हे सिडकोच्या स्मार्ट सिटीच्या यादीत सर्वप्रथम आहे. मात्र, अंत्यविधीसाठी लाकडेही उपलब्ध होऊ शकत नसल्याने मृतदेहाची अवहेलना सुरू असल्याचे विदारक चित्र दुसरीकडे दिसून येत आहे.खारघर सेक्टर-१४ या ठिकाणी सिडकोने उभारलेली स्मशानभूमी असून, तिची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र, पर्याय नसल्याने नातेवाइकांना याच ठिकाणी अंत्यविधी करावे लागत आहेत. शुक्र वारी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबीयाला स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याने बेलापूर या ठिकाणी जाऊन अंत्यविधी करावे लागले. एकविसाव्या शतकातील शहर म्हणून बिरु दावली मिरवणाºया सिडको प्रशासनाला हे कृत्य शोभणारे नाही. दु:खाचे डोंगर कोसळलेले शोकाकुल कुटुंब याबाबत वाच्यता करण्याच्या मनस्थितीतही नव्हते. विशेष म्हणजे, सिडको मार्फत शहरातील स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी कोट्यवधी रुपये कंत्राटदाराला दिले जातात. मात्र, एवढे पैसे खर्च करूनही अंत्यविधीसाठी वेळेवर लाकडे उपलब्ध होत नाहीत, हे दुर्दैव. खारघर नोड हे पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत येत असले, तरी सिडको नोडचे हस्तांतर झाले नसल्याने पालिका आपली जबाबदारी सिडकोकडे झटकत आहे. मात्र, हस्तांतराचे कारण पुढे करीत सिडकोदेखील विविध विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील स्मशानभूमींची अवस्था आणखी बिकटपनवेल महानगरपालिका हद्दीत २९ गावांचा समावेश आहे. यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरित स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी देखील योग्य जागा नाही. पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच पालिका प्रशासनदेखील याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.जबाबदारी सर्वस्वी सिडकोचीखारघर नोडही पनवेल महापालिकेत समाविष्ट झाले असले, तरी या नोडचे हस्तांतर अद्याप पालिकेकडे झालेले नाही, त्यामुळे स्मशानभूमीची देखरेख पूर्णपणे सिडकोची जबाबदारी आहे.- जमीन लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिकापनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने परिसराच्या विकासाबाबत हात झटकल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करून देत असताना, खारघरमधील स्मशानभूमीत पैसे खर्चूनही लाकडे मिळत नाहीत. नागरिकांनी या संदर्भात तक्रार केल्यावर याबाबत पनवेल महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.- जयेश गोगरी, कार्याध्यक्ष, शाश्वत फाउंडेशन, खारघर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई