शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पनवेल आरटीओमध्ये अपुरे मनुष्यबळ, १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 07:12 IST

आरटीओ कार्यालयास समस्यांचा विळखा पडला आहे. अडगळीच्या ठिकाणी कार्यालय असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.

- वैभव गायकरपनवेल  - आरटीओ कार्यालयास समस्यांचा विळखा पडला आहे. अडगळीच्या ठिकाणी कार्यालय असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आवश्यकतेपेक्षा तब्बल १७ अधिकारी व कर्मचारी कमी असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण वाढत असून, त्याचा फटका नागरिकांनाही बसू लागला आहे.शासनाने राज्यातील ३७ प्रादेशिक परिवहन अधिकाºयांवर कारवाई केली. यामध्ये पनवेलमध्ये काम केलेल्या सहा जणांचा समावेश आहे. यामधील चौघांची यापूर्वी बदली झाली असून दोन जण सद्यस्थितीमध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून पनवेल आरटीओ कार्यालयही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथील समस्यांकडेही लक्ष वेधले जाऊ लागले आहे. आरटीओ कार्यालयासाठी ६९ जागा मंजूर आहेत; परंतु प्रत्यक्षात ५४ अधिकारी व कर्मचारीच उपलब्ध असून त्यामधीलही दोन जणांचे निलंबन झाले असल्यामुळे कर्मचाºयांची संख्या ५२ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, १८ सहायक मोटार वाहन निरीक्षक, दहा सहायक मोटारवाहन निरीक्षक यांच्यासह सर्व कर्मचारी पकडून ५० ते ५४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असतात. राज्यातील सर्वाधिक कामकाज असणाºया कार्यालयांमध्ये पनवेलचा समावेश आहे. येथे रोज सरासरी १२० ते १६० वाहनांची नोंदणी होत असते. या गाड्यांची पासिंग, लायसन्स, चेकिंग तसेच विविध कामे सहायक मोटारवाहन निरीक्षक करीत असतात. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे उपलब्ध कर्मचाºयांवरील ताण वाढू लागला आहे. शासनाने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला असंख्य समस्यांचा गराडा पडला आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय हे कळंबोली लोह-पोलाद बाजारपेठेत आहेत. या ठिकाणी पार्किंग, तसेच विविध समस्या आहेत. अपुºया जागेमुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. स्वत:ची जागा नसल्यामुळे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेवर कार्यालय सुरू आहे. अपुरी जागा व इतर समस्यांमुळे येथे कामासाठी येणाºया नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. परिवहन कार्यालयासाठी करंजाडे येथे जागा मंजूर करण्यात आली आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मंजूर पदांची संख्यापनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण ६९ पदांची मंजुरी मिळाली आहे, यामध्ये ३६ अधिकारी आहेत, तर उर्वरित कर्मचारी आहेत. मात्र, सध्याच्या घडीला केवळ ५४ पदे भरलेली आहेत. मंजूर पदांपेक्षा कमी मनुष्यबळावर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा गाडा पुढे हाकला जात आहे. विशेष म्हणजे, यापैकीच दोन सहायक मोटारवाहन निरीक्षकांचे निलंबन झाल्याने हा ताण आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.समस्या सोडवाव्यापनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय हे कळंबोली लोह-पोलाद बाजारपेठेत आहेत. या ठिकाणी पार्किंग, तसेच विविध समस्या आहेत. अपुºया जागेमुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. या सर्व समस्या लवकर सोडवाव्या, अशी मागणी केली जात आहे.निलंबित अधिकाºयांमध्ये पनवेलचे सहा अधिकारीराज्यभरातील निलंबित केलेल्या ३७ आरटीओ अधिकाºयांच्या यादीत पनवेल कार्यालयातील सहा अधिकाºयांची नावे आहेत.सध्याच्या घडीला यापैकी दोन सहायक मोटारवाहन निरीक्षक या ठिकाणी कार्यरत होते.उर्वरित चार अधिकाºयांच्या २०१७ रोजीच बदल्या झाल्या असल्याने, ते राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत आहेत. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnewsबातम्या