शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यनिर्मात्याला नाकारली व्हीआयपी रूम, कर्मचा-यांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 02:39 IST

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी व लाखो प्रेक्षकांना करमणुकीचे दालन उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल शहरात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत या नाट्यगृहात शेकडो नाटके झाली.

मयूर तांबडे पनवेल : महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी व लाखो प्रेक्षकांना करमणुकीचे दालन उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल शहरात आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत या नाट्यगृहात शेकडो नाटके झाली. मात्र यावेळी वाईट अनुभव येत असल्याचा आरोप सिनेकलाकार, प्रेक्षक तसेच निर्मात्यांकडून होत आहे. याठिकाणी आयोजित नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी एका निर्मात्याला नाट्यगृहातील व्हीआयपी रूम नाकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामुळे नाट्यनिर्माते व नाट्यरसिक नाराज झाले आहेत.पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे उद्घाटन १ जून २0१४ रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. फडके नाट्यगृहामुळे महापालिकेला महिन्याला लाखो रु पयांचा तोटा होत असल्याचे समोर आले आहे. फडके नाट्यगृहात पार्किंगची समस्या भेडसावत आहे. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या क्षमतेपेक्षा वाहनतळाची जागा अपुरी आहे. त्यामुळे नाट्यगृहात असलेले भूमिगत पार्किंग सुरू करण्याची मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षात फडके नाट्यगृहात शेकडो नाटके, स्नेहसंमेलने, राजकीय कार्यक्र म घेण्यात आले. कधी सुरक्षेच्या कारणावरून तर कधी असुविधांमुळे नाट्यगृहाची चर्चा होतच राहिली आहे. १७ सप्टेंबर रोजी फडके नाट्यगृहात स्टॅचू आॅफ लिबर्टी या नाटकाचा शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी येथील कर्मचाºयाकडे व्हीआयपी रूमची मागणी केली. मात्र या कर्मचाºयाने त्यांना व्हीआयपी रूम देण्यास नकार दिला. याच नाट्यगृहात ज्येष्ठ निर्माते, कलावंत यांना १०ते १५ मिनिटे व्हीआयपी रूम वापरण्यास देत होते. मात्र भंडारे यांच्या म्हणण्यानुसार येथील कर्मचाºयाने त्यांना व्हीआयपी रूम न दिल्याने आलेले ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार नाराज झाले. त्यामुळे येथील कलाकारांच्या सुरक्षेला कोण जबाबदार राहील असा सवाल त्यांनी केला आहे. येथील कलाकारांची चेंजिंग रूम देखील छोटी आहे. कलाकारांना व्हीआयपी रूम नाकारली जाते. व्हीआयपी रूमचे अतिरिक्त पैसे हवे असतील तर पैसे घ्या असे सांगून देखील व्हीआयपी रूम नाकारल्याचे भंडारी यांनी सांगितले. कलावंतांना व्हीआयपी रूम देण्यास नकार देत असतील तर नाटक करण्यास निर्माते नकार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.>फडके नाट्यगृहात ३ तासांच्या नाटकासाठी १२ हजार रु पयांचे भाडे भरले होते. व्हीआयपी रूमचा अतिरिक्त चार्ज भरण्यासही तयार होतो. दोन महिन्यांपूर्वी ९ जुलै रोजी प्रयोग सुरू होण्याच्या आधी एका रसिकाने नाटक बंद करा, अन्यथा बॉंम्बस्फोट होऊ शकतो अशी धमकी दिली होती. त्यामुळे नाट्यगृहात येणाºया कलावंतांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.- राहुल भंडारे, निर्माते>निर्मात्याने माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही. सध्या व्हीआयपी रूमचे भाडे २ हजार रु पये आकारण्यात येत आहे.- अरु ण कोळी,व्यवस्थापकीय अधिकारी,वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह