शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजयासाठी उमेदवारांचे देवांना साकडे

By admin | Updated: May 10, 2017 00:27 IST

पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. साऱ्याच पक्षांचे उमेदवार

मयूर तांबडे । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. साऱ्याच पक्षांचे उमेदवार सकाळी मंदिर व मशीदमध्ये जाऊन देवदेवतांना विजयाचे साकडे घालत आहेत. धार्मिक स्थळांना भेट देत अनेक उमेदवारांनी प्रचाराला सुरु वात केली.प्रमुख पक्षांसह अपक्षांनी देखील विजयासाठी देवांना साकडे घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देवालयांमध्ये एकच गर्दी केली आहे. प्रचारांचे नारळ फोडून उमेदवार प्रचाराला लागले आहेत. शहरातील मंदिरात आरती करून काहींनी अभिषेक घातले. महापालिका निवडणुकीत पनवेल शहरात वीस प्रभाग असून ७८ नगरसेवक निवडून येणार आहेत. ६३६ उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज भरले होते. यातील ४९ अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणुकीसाठी झालेल्या छाननीत सूचक, अनुमोदक वेगळ्या प्रभागातील असणे, दोन वेगवेगळ्या प्रभागात अर्ज सादर करणे यामुळे हे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. नावडे येथील केंद्रातून ९ (प्रभाग क्र .१,२,३,), खारघर केंद्रातून ७ (प्रभाग ४,५,६,) , कळंबोली केंद्रातून १ (प्रभाग ७,८,९,१०) , कामोठे केंद्रातून १५ (प्रभाग ११,१२,१३) ,नवीन पनवेल केंद्रातून ४ ( प्रभाग १४,१५,१६), आणि पनवेल केंद्रातून १३ (प्रभाग १७,१८,१९,२०) असे एकूण ४९ अर्ज अवैध ठरले. एकूण ६३६ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उरले आहेत.सर्वच पक्षांसह अपक्षांनी देखील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मोठ्या संख्येत येथून उमेदवार लढत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी आपला प्रचाराचा मेगाप्लॅन तयार केला आहे. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १२ मे रोजी चिन्हवाटप आणि उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे पनवेल परिसरात रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी सर्वप्रथम देवांना विजयासाठी साकडे घातल्याचे दिसून आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येत मंदिर, मशीद, गुरु द्वारा व बुद्धविहार आहेत. या सर्वच ठिकाणी उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. उमेदवारांसह मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांना सोबत घेवून विजयी होण्यासाठी देवांना साकडे घालण्यात येत आहे. नारळ, हार, पेढ्यांचा प्रसाद उमेदवारांकडून वाहिला जात आहे. गेल्या दोन ते चार दिवसांपासून महापालिका निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. इतरांपेक्षा आपणच कसे सरस राहू यावर प्रत्येक उमेदवार भर देत आहे. २४ मे रोजी मतदान आणि २६ मे रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्र म आहे.