शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

सुधागडावर महादरवाजाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:00 IST

‘बा रायगड परिवार’चा उपक्रम : श्रमदानातून गडाला मिळाले गतवैभव

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील सुधागडला श्रमदानातून गतवैभव मिळवून देण्याचे काम ‘बा रायगड परिवार’च्या माध्यमातून सुरू आहे. गडावरील मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर लोकसहभागातून महादरवाजा तयार करण्यात आला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्याचे लोकार्पण करण्यात आले.

देशातील प्राचीन किल्ल्यांमध्ये समावेश होणाऱ्या सुधागड किल्ल्यावर बा रायगड परिवाराचे सदस्य काही वर्षांपासून संवर्धनाचे काम करीत आहेत. गडावरील महादेव मंदिर व गजलक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून महादरवाजा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी लागणारे साहित्य दोन तास डोंगर चढून गडावर नेण्यात आले. शिवजयंतीला या दरवाजाचे लोकार्पण करण्यात आले.या वेळी शहीद दीपक घाडगे यांचे कुटुंबीय, सरदार नेताजी पालकर यांचे वंशज अशोक पालकर, सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांचे वंशज, ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

बा रायगड परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी गडावर शिवजयंती साजरी केली जाते. रात्री महादरवाजा ते पंत सचिवाचा वाड्यापर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमास जवळपास दीड हजार शिवप्रेमी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने गडावर सातत्याने दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून महादरवाजा बनविण्यात आला आहे. संवर्धनाच्या कामातील एक टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याचे मत संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई