शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीतील व्यापारात घट

By admin | Updated: August 4, 2015 03:00 IST

जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरावरच्या व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे

उरण : जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरावरच्या व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. बंदरातून कंटेनर आयात-निर्यातीची क्षमता घटल्याने कामगार आणि जीटीआय व्यवस्थापन या दोघांनी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी केली आहे. जेएनपीटीच्या माध्यमातून सोमवारी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि जीटीआय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. तिन्ही बंदरावर होणाऱ्या आर्थिक नुकसानाची दखल घेत शुक्रवारपर्यंत बैठक घेऊन सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचे आवाहनही बन्सल यांनी बैठकीतून केले.जीटीआय व्यवस्थापनाने नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या १९४ कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्याचा आणि महेश इंटरप्रायझेस कंपनीचा कामाचा ठेका रद्द करण्याचा निर्णय सात दिवसांत घेतला नाही तर बंदराचे कामकाज बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीने शनिवारी दिला. कामगारांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीटीआय बंदरात सुरू केलेल्या स्लोडाऊन आंदोलनाचा जीटीआय बंदराबरोबरच जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जेएनपीटीच्या प्रशासन भवनात आयोजित बैठकीस माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. मनोहर भोईर, माजी आ. विवेक पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, जे. एम. म्हात्रे, संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील, महिला तालुका अध्यक्षा भावना घाणेकर, शेकाप चिटणीस महादेव घरत, जीटीआय बंदराचे सीईओ रवी गायतोंडे, राजेश सिंग आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघर्ष समिती आणि जीटीआय अधिकारी यांच्यात कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा झाली. वारंवार आश्वासने देऊन कामगारांची फसवणूक करणाऱ्या जीटीआय व्यवस्थापनावर विश्वास राहिला नसल्याचेही संघर्ष समितीने या वेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)