शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेमुळे महसुलात घट

By admin | Updated: March 31, 2017 06:36 IST

रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली

वैभव गायकर / पनवेलरायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेच्या महसुलाबाबत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या पनवेल नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात तब्बल ३० टक्क्यांनी घट झाली आहे. याचा फटका रायगड जिल्हा परिषदेला बसला आहे.गतवर्षी १०० कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. मात्र यावेळी २०१७-१८ साठी ४५ कोटी ३१ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर करून सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. जिल्हा परिषदेत नव्याने सत्तेत आलेल्या शेकाप -राष्ट्रवादी आघाडीला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींचा फटका बसला आहे.रायगड जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कापैकी सुमारे ४० टक्के शुल्क पनवेल तालुक्यातून मिळत होते. गतवर्षी जिल्हा परिषदेत ९६ कोटींचे मुद्रांक शुल्क जमा झाले. यापैकी ३५ कोटी शुल्क पनवेल तालुक्यातूनच मिळाले आहे. पनवेल महापालिका झाल्याने यात तालुक्यातील खारघर, कामोठे यासारख्या कोट्यवधींचे बजेट असणाऱ्या ग्रामपंचायती विलीन झाल्या आहेत. याचा परिणाम रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर झाला आहे. अर्थसंकल्पात अनेक नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. यात प्राथमिक शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन आणि समाज कल्याण विभागासाठी चांगल्या योजना घेतल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ चा अर्थसंकल्प ४५ कोटी ३१ लाख एवढा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बांधकाम विभागासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी १५ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये साडेतीन कोटी रु पयांनी घट झाली आहे. शिक्षण विभागासाठी मूळ अर्थसंकल्पात दीड कोटींची तरतूद करण्यात आली होती. गतवर्षी शिक्षण विभागासाठी ३ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली होती. आरोग्य विभागासाठी १ कोटी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गतवेळी अडीच लाख रु पयांची तरतूद आरोग्य विभागातील योजनांसाठी करण्यात आली होती. कृषी विभागासाठी मूळ अर्थसंकल्पात १ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा २ कोटींची घट आली आहे. गतवेळी ३ कोटींंची तरतूद कृषी विभागासाठी करण्यात आल होती. पशुसंवर्धन विभागासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी १ कोटी ९५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मूळ अर्थसंकल्पाच्या २० टक्के निधी हा पाणीपुरवठा विभागातील योजनांसाठी नियमांनुसार आरक्षित आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागासाठी ८ कोटी रु पयांच्या निधीची तरतूद मूळ अर्थसंकल्पात केली आहे. त्याचसोबत २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून, सुमारे ७२ कोटी रु पयांवर अंतिम करण्यात आले आहे. यामुळे गतवेळचे अंदाजपत्रक ९३ लाख करण्यात आले असून, यात ४४ कोटी ३८ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे.रायगड जिल्हा परिषदेला मिळणारा महसूल हा मुद्रांक शुल्क रूपात मिळणार आहे. रायगड जिल्हा परिषदेला सर्वाधिक मुद्रांक शुल्क हे पनवेल तालुक्यातून मिळते. पनवेल महानगरपालिकेमुळे मुद्रांक शुल्क मिळवून देणाऱ्या ग्रामपंचायती महापालिकेत विलीन झाल्या आहेत. यामुळे कोट्यवधींच्या मुद्रांक शुल्कात घट झाली आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. गत अर्थसंकल्पापेक्षा ३० कोटींनी घट झाली असली तरी शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा आदी विभागाला राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजनांचा निधी प्राप्त होत असतो. यामुळे अर्थसंकल्प कमी असला तरी जिल्ह्याचा विकास निश्चित वेगात होईल.- राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिपमूळ अर्थसंकल्पाच्या २० टक्के निधी हा समाजकल्याण विभागासाठी देण्यात येतो. त्यानुसार ८ कोटींची तरतूद आहे.३ टक्के निधी अपंग कल्याण विभागासाठी देण्यात येतो. त्यानुसार १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.महिला, बाल-कल्याण विभागाला ४ कोटींची तरतूद केली आहे.